एकुलत्या एक लेकरालाही पाहायचा योग आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST2021-05-05T05:06:18+5:302021-05-05T05:06:18+5:30

शहापूर तालुक्यातील वासिंद शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, वासिंदमध्ये एका आठवड्यात एकाच कुटुंबातील वृद्ध आई व तिच्या ...

I didn't even get to see a single child | एकुलत्या एक लेकरालाही पाहायचा योग आलाच नाही

एकुलत्या एक लेकरालाही पाहायचा योग आलाच नाही

शहापूर तालुक्यातील वासिंद शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, वासिंदमध्ये एका आठवड्यात एकाच कुटुंबातील वृद्ध आई व तिच्या दोन तरुण मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. साेमवारी धाकट्या मुलाच्या रक्षाविसर्जनाचा दिवस. मात्र या दिवसाला कुणाला उपस्थित राहता येऊ शकले नाही. वासिंद शहरातील दहागाव रस्त्यालगत शेलार आळीमध्ये राहणाऱ्या शेलार कुटुंबातील मायलेकरांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अनंता हा पडघा येथील ॲमेझॉन कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत होता. पहिल्यांदा त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याची आई सरस्वती यांनाही संसर्ग झाल्याने सरस्वती यांचा उपचार सुरू असताना पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभरातच निवृत्ती व अनंता या सख्ख्या भावांचा कल्याण येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. निवृत्ती हा कंत्राटदार होता. त्यास पत्नी व एक सात वर्षांचा मुलगा आहे, तर त्याचा लहान भाऊ अनंता यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. या दोघा भावांवरच कुटुंबाची सर्व जबाबदारी होती. मात्र, कोरोनाने शेलार कुटुंबातील आईसह घरातील दोन तरुण कर्त्या पुरुषांचा बळी घेतल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे.

Web Title: I didn't even get to see a single child