शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मी कुणालाही इंजेक्शन देऊ शकतो, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना गर्भीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 19:36 IST

कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीत कल्याण डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले.

ठळक मुद्देकल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीत कल्याण डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले.

कल्याण - मी डॉक्टर नसलो तरी मी कुणालाही इंजेक्शन देऊ शकतो. डॉक्टर नसले तरी इंजेक्शन देता आले पाहिजे असा गर्भीत इशारा विरोधकांना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी हसत हसत दिला. या वाक्याला सावरुन घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, तुम्ही इंजेक्शन देऊ नका. नाही तर मुख्यमंत्री म्हणाले कुणालाही इंजेक्शन द्या असा त्याचा अर्थ घेताल, याकडेही लक्ष वेधले. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीत कल्याण डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाविषयी गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना इंजेक्शन देण्यात येईस असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजपचे खासदार कपील पाटील यांनी मी जरी डॉक्टर नसलो तरी जनतेची कामे करतोच ना. जनतेची कामे करण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही असा चिमटा काढला होता. मात्र हा चिमटा काढत असताना भिवंडी ग्रामीण भागात कोविड रुग्णालये नव्हते. त्यामुळे हाल झाले. हद्दीचा मुद्दा आड न येता भिवंडीतील कोवीड रुग्णांना कल्याणच्या रुग्णालयात उपचार व्हावेत अशी मागणी केली. त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात मी आहे. त्यांनी चांगले काम केले असल्याची कबूली दिली.

खासदार पाटील यांनी चिमटा काढल्याने त्याला उत्तर देताना खासदार शिंदे यांनी कोविड रुग्णालय हे पाटील यांच्या मतदार संघात उभे राहिले आहे. एक चांगले काम झाले आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख केला गेला पाहिजे. मी काम करीत असताना भेदभाव करीत नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, कोविड काळात काम करीत असताना पालकमंत्री या नात्याने भेदभाव केला नाही. सरकारकडून निधी मंजूर करुन दिला. श्रीकांत डॉक्टर असल्याने त्याला आरोग्याच्या संदर्भातील गोष्टी चांगल्या कळतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले असल्याचे नमूद केले.या सगळ्य़ावर कडी करीत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त उद्गार काढले.

तसेच कपील पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या संपर्कात असतो असे म्हटले होते. तोच धागा पकडून असे आमच्या संपर्कात राहा. तूम्हाला आम्ही आमचेच समजतो असेही मुख्यमंत्री पाटील यांना म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महापौर विनिता राणे यांच्या कामाचा गौरव केला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी इतके पालकत्व घेतले की, त्यांना कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी मात केली. याकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री