पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल
By प्रशांत माने | Updated: April 12, 2023 20:30 IST2023-04-12T20:30:02+5:302023-04-12T20:30:09+5:30
पतीवर विनयभंगाचा गुन्हा

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल
डोंबिवलीः वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पीडित पत्नीने नोंदविलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात पती विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मार्च २०२० साली या दोघांचं लग्न झाले. गेल्या काही महिन्यांपासून या पती-पत्नीमध्ये वाद होत होते. यादरम्यान पीडित महिलेच्या पतीने तिचे अश्लील व्हिडिओ काढले तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या संतापजनक घटनेचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहाण केली.
आपला पती दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली तिने याबाबत विचारणा केली असता पतीने व कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावल्याचीही तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यावरून पतीच्या जवळच्या नातेवाईकांविरोधात ही दमदाटी, शिवीगाळीचे गुन्हे दाखल झाले आहेत.