भिवंडीत पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी पतीस तालुका पोलिसांनी केली अटक

By नितीन पंडित | Published: April 11, 2023 07:06 PM2023-04-11T19:06:01+5:302023-04-11T19:06:42+5:30

या घटनेची माहिती सोनाळे गावाचे पोलिस पाटील शत्रुघ्न पाटील यांनी तालुका पोलिसांना दिली होती. 

Husband kills wife in Bhiwandi; The accused husband was arrested by the taluka police | भिवंडीत पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी पतीस तालुका पोलिसांनी केली अटक

भिवंडीत पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी पतीस तालुका पोलिसांनी केली अटक

googlenewsNext

भिवंडी: सासरी न राहता वेगळे बिऱ्हाड थाटण्याचा तगादा लावणाऱ्या पत्नीची पतीने निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीस तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मुंबई नाशिक वाहिनी लगत एका अज्ञात महिलेची गला आवळून मृतदेह हत्या करून फेकलेला आढळून आला होता.

या घटनेची माहिती सोनाळे गावाचे पोलिस पाटील शत्रुघ्न पाटील यांनी तालुका पोलिसांना दिली होती. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी सुरुवातीला अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता. अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी व तिच्या वारसांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

रात्री उशिरा मयत महिलेची ओळख व नाव निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. मयत महिलेचे नाव रमशा अब्दुल रहमान अन्सारी वय २४ रा.अजमेर चौक, शांतीनगर असे तपासात समजल्यावर मयताचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यास पोलिसांनी सुरवात केली. तपासात संशयाची सुई पतीकडे वळल्यानंतर पोलिस पथकाने रात्री पाऊणे दोन वाजताच्या सुमारास पती अब्दुल रहमान बिलाल अन्सारी वय २६  रा.बिलाल नगर, शांतीनगर येथून पतीस ताब्यात घेत चौकशी केली असता ,पत्नी आपल्या घरच्यांपासून वेगळे राहण्यासाठी तगादा करीत होती परंतु वडील आजारी असल्याने त्यांना सोडून राहणे जमणार नसल्याने त्यावरून वाद विकोपाला जावून पत्नीची हत्या केल्याचे ने कबूल केले.यानंतर पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत पती अब्दुल रहमान बिलाल अन्सारी यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे .

Web Title: Husband kills wife in Bhiwandi; The accused husband was arrested by the taluka police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.