पत्नीची हत्या करुन पसार झालेल्या नवऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:10+5:302021-09-06T04:45:10+5:30

मुंब्राः कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून तीन वर्षांच्या चिमुरडीसह पसार झालेल्या शाहनवाझ सैफी याला पोलिसांनी इटारसी ...

Husband arrested for murdering wife | पत्नीची हत्या करुन पसार झालेल्या नवऱ्याला अटक

पत्नीची हत्या करुन पसार झालेल्या नवऱ्याला अटक

मुंब्राः कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून तीन वर्षांच्या चिमुरडीसह पसार झालेल्या शाहनवाझ सैफी याला पोलिसांनी इटारसी रेल्वे स्थानकातून रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक केली. न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १ सप्टेंबरला त्याने त्याची पत्नी सदफ हिची बुऱ्हाणी गृहसंकुलाच्या ए विंगमधील रूम नंबर ७६ या राहत्या घरात वारंवार होत असलेल्या कौटुंबिक वादातून हत्या केली होती. त्यानंतर घरातील गॅस सिलिंडर लीक करून घराला बाहेरून कडी लावून तो मुलीला घेऊन पसार झाला होता. तो त्याच्या उत्तर प्रदेश राज्यातील मूळगावी मुरादाबाद येथे चालला होता. तो तेथे पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

Web Title: Husband arrested for murdering wife