शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! गरम चटणीमध्ये पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:04 IST

घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमधील शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे घडली.

 अंबरनाथ - घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमधील शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे घडली. घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात  ही चिमुकली खेळता खेळता पडली. चटणी गरम असल्याने ती 80 टक्के भाजली. तिला लागलीच उपचारासाठी दाखल केले असता तिचा दुपारी मृत्यू झाला. 

  मंगळवारी पहाटे शास्त्रीनगर भागातील रामास्वामी यांच्या घरात हा प्रकार घडला. रामास्वामी हे इटली -वडा विकण्याचा व्यवसाय करतात. सकाळी 8 वाजता ते इटली विकण्यासाठी घराबाहेर पडतात. दररोजप्रमाणो ते पहाटे 4 वाजता उठुन ते इटली,वडा,सांबर आणि टोमॅटोची चटणी तयार करतात. मंगळवारी देखील त्यांनी टोमॅटोची चटणी मोठय़ा टोपात तयार केली होती. हा टोप त्यांनी घरातच एका कोप-यात ठेवले होते. याचवेळी पहाटे 5 वाजता त्यांची मुलगी तनुष्का रामास्वामी ही खेळत खेळत त्या टोपाजवळ आली.टोपात वाकून बघत असतांना ती त्या टोपातच पडली. तिचा चेह-याचा भाग थेट टोपात गेल्याने ती त्या गरज चटणीमुळे 80 टक्के भाजली. हा प्रकार कळताच त्या मुलीच्या पालकांनी तीला लागलीच रुग्णालयात हलविले. सकाळी तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार देखील सुरु झाला. मात्र या अपघातात ती 88 टक्के भाजल्याने दुपारी 1 वाजता तिचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात