शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

शेकडो क्विंटल तूरडाळ पडून; वाटप न केल्याने जिल्ह्यातील कार्डधारकांमध्ये तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 1:16 AM

ज्यांनी सहा महिन्यांपासून रेशनिंगवरील धान्य घेतलेले नसेल, त्यांचे कार्ड कायमचे बंद करण्यात येत असल्याची चर्चा आधीच सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख ४९ हजार २०० पेक्षा अधिक कार्डधारकांची नावे कायमची वगळण्यात येणार आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शिधावाटप दुकानांवर गहू, तांदूळ व तूरडाळ मिळत असे. सद्य:स्थितीला जिल्ह्यातील या शिधावाटप दुकानांवर शेकडो क्विंटल तूरडाळ पडून आहे. या डाळींचे वितरण होत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील  कार्डधारकांकडून ऐकायला मिळत आहेत. दुकानांमधील या तूरडाळीचे वितरण थांबवल्यामुळे कार्डधारकांत संताप व्यक्त होत आहे.ज्यांनी सहा महिन्यांपासून रेशनिंगवरील धान्य घेतलेले नसेल, त्यांचे कार्ड कायमचे बंद करण्यात येत असल्याची चर्चा आधीच सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख ४९ हजार २०० पेक्षा अधिक कार्डधारकांची नावे कायमची वगळण्यात येणार आहेत. यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब यादीतील कार्डधारकांची नावे आहेत. या कारवाईतून बचाव करण्यासाठी बहुतांश कार्डधारक गहू, तांदूळसह तूरडाळ घेण्यासाठी दुकानांवर धाव घेत आहेत. मात्र, त्यांना दुकानात उपलब्ध असलेली तूरडाळ सवलतीच्या दरातही मिळत नसल्यामुळे त्यांच्यात संताप व्यक्त केला जात आहे.हे लाभार्थी घेतात लाभजिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब यादीतील ७,४४,४७७ कार्डधारकांपैकी ५,९६,७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करतात. या कार्डधारकांपैकी अंत्योदय योजनेचे शहरी भागात १३, १३० लाभार्थी आहेत. यांपैकी जिल्ह्याभरातील ११,६२६ कार्डधारक अन्नधान्याचा लाभ घेत आहेत.कोरोनाकाळात पुरवठाजिल्ह्यातील शहरी भागात ७,५७,६०० कार्डधारकांची नोंद आहे. यांपैकी ६,०८,४०१ कुटुंबांकडून दरमहा या स्वस्त धान्य दुकानांतील किराणा घेतला जात आहे. मात्र, कोरोनाकाळात हजारो कार्डधारकांना मोफत, तर कार्ड नसलेल्या गरजूंना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात आले. त्यासाठी दरमहा दहा हजार ९१७ मेट्रिक टन अन्नधान्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आला होता. कोरोनाच्या कालावधीत वाटपासाठी उपलब्ध झालेली तूरडाळ शिधावाटप दुकानांवर आजही आहे; पण या डाळीला वाटप करण्याची परवानगी नसल्यामुळे तिचे वितरण करण्याचे थांबवले आहे. शासनपातळीवर त्यावर लवकरच निर्णय होईल. त्यानुसार कारवाई करता येईल.- नरेश वंजारी, उपनियंत्रक, शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ, ठाणे