शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासिंग ठाकूरला कॅन्सर नसताना जामिन कसा दिला? आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय सरचिटणीस  आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या बोगस आजारपणाचे बिंग फोडले आहे.

 ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय सरचिटणीस  आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या बोगस आजारपणाचे बिंग फोडले आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी प्रज्ञासिंग हिला कॅन्सर नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, आजारपणाच्या मुद्यावर तिला जामीन कसा मंजूर करण्यात आला? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. मालेगाव आणि नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर हिने कॅन्सर असल्याचा दावा करुन एनआयए कोर्टातून जामीन मिळवला आहे. तिचा हा दावा बनावट असल्याचा खुलासा डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी केला आहे. तीला कर्करोगच नाही तर कुठलाच आजार नव्हता, असे या दोघांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या  या खुलाश्याचा आधार घेऊन आ. आव्हाड यांनी हे ट्वीट केले आहे. जर, प्रज्ञासिंग हिला कोणताही आजार नव्हता तर अटकेतली 9 वर्षामधील 6 वर्षे ती हॉस्पिटलमध्ये कशी राहू शकली? पोलिस, तपास यंत्रणांनी, न्यायालयाने, डॉक्टरांनी त्यावर आक्षेप का घेतला नाही. असा कुठला राजकीय दबाव होता आणि न्यायालयानेही आजारपणाचा दाखला देत तीला जामीन कसा काय दिला ? दुसरीकडे  छगन भुजबळ हे वेदनांनी अस्वस्थ होते; त्यांना यकृताचा गंभीर आजार झाला होता. तरीही,  क्षणाक्षणाला त्यांना त्रास दिला जात होता. उपचारांची गरज असतानाही त्यांना रुग्णालयाऐवजी तरुंगात पाठवून सरकार त्यांच्या मरणाची वाट पहात होते, असा आरोप ट्वीटच्या माध्यमातून करुन,  प्रज्ञासिंग ठाकूर ला एक न्याय आणि छगन भुजबळ यांना दुसरा न्याय का केला. याबाबत चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड