शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सफाई कामगाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:17 PM

चॉकलेटचे अमिष दाखवित एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया संतोष शिंदे(४५) या सफाई कामगाराला गुरुवारी रात्री चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने मानपाडा भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमानपाडयातील घटना चॉकलेटचे अमिष दाखवून ओढले स्वत:च्या घरात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: मानपाडा भागातील एका आठ वर्षीय मुलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणा-या संतोष काशिराम शिंदे(४५, रा. एमएमआरडीए, वसाहत, ठाणे) या सफाई कामगाराला गुरुवारी रात्री चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पिडीत मुलगी ही घोडबंदर रोडवरील दोस्ती एम्पेरिया इमारतीमधील एमएमआरडीएच्या घरांमध्ये वास्तव्याला आहे. तिची आई घरकाम करते. तर वडील सफाई कामगार आहेत. घरातील गॅस संपल्यामुळे २९ आॅगस्ट रोजी तिला शाळेत नेण्यासाठी आईने डबा बनविला नव्हता. त्यामुळे ती घरीच होती. तर आई वडील हे दोघेही कामावर गेले होते. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान त्याच इमारतीमधील सफाई कामगार शिंदे याने तिला मी सांगेल तसे केल्यास मोठे चॉकलेट देईल, असे अमिष दाखवित त्याच्या घरात नेले. तिथे तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तिने आरडाओरडा केला. तिने कशीबशी त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली आणि तिच्या घरात गेली. त्यानंतरही पुन्हा तिच्या मागे येत त्याने तिला त्याच्या घरात बोलविण्याचा प्रयत्न केला. परंतू, तिने दरवाजा न उघडल्याने ती यातून बचावली. हा प्रकार तिने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी परतलेल्या आपल्या आईला सांगितला. त्यावेळी तिच्या आईसह शेजारच्या महिलांनी चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या पथकाने शिंदे याला मानपाडा भागातून रात्री ११ वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध ३७६ - अ, ब आणि लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणअधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पिडीत मुलीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार