शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

कबड्डी स्पर्धेत संमिश्र यशाने यजमानांची सलामी 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 02, 2023 3:38 PM

मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघाने रंगतदार लढतीत पिछाडी भरून काढत नाशिक शहर संघाला मात दिली.

ठाणे  : धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विट्ठ क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबडी स्पर्धेत यजमान ठाण्याच्या संघाची संमिश्र यशाने सुरुवात झाली. मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघाने रंगतदार लढतीत पिछाडी भरून काढत नाशिक शहर संघाला मात दिली तर मुलींच्या लढतीत आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला अन्य लढतीमध्ये पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. 

कुमार गटातील ठाणे ग्रामीण आणि नाशिक शहर या संघातील लढत खूपच रंगतदार ठरली. सामन्याच्या पहिल्या डावात उभय संघ १३-१३ असे बरोबरीत होते. उत्तरार्धातही दोन्ही संघांच्या सावध खेळामुळे गुणफलक दोलायमान स्थितीत होता.सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिव्येश पाटीलच्या आक्रमक खेळाने ठाणे ग्रामीण संघाला आघाडी मिळवून दिली. दिव्येशने एकाच चढाईत तीन गडी बाद करत पारडं आपल्या बाजूने झुकवले. दिव्येशने त्याआधी दोन वेळा एकाच चढाईत दोन खेळाडू बाद केले. ठाणे ग्रामीण संघाने दुसऱ्या डावात १८ गुणांची कमाई करत हा सामना ३१-२९ असा जिंकला. सामन्यात हर्ष भोईरने सुरेख पकडी करत दिव्येशला चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या ऋषी दाबांगे आणि ज्ञानेश्वर शेळकेने चांगला खेळ केला.

कुमारांच्या अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघाने धुळे संघाचा ४१ - २४ असा पराभव करत विजयाचे खाते खोलले. या सामन्यात कृष्णा चव्हाण, देव शिर्के आणि  विकास जाधव यांनी चतुरस्त्र खेळ करत संघाला सहज मिळवून दिला.

मुलींच्या लढतीत आश्वासक आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरुद्ध प्रभावाची चव चाखायला लागली. सामन्यतः ठाणे ग्रामीण संघाने १६-१० अशी आघाडी घेतली होती. पण मध्यतरानंतर आक्रमण आणि बचावाचा सुंदर मिलाफ साधत मुंबई उपनगर पश्चिम संघाने २६-२५ अशी बाजी मारली. आकांक्षा बने आणि नयन झाने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत संघाला विजय मिळवून दिला . तर सानिया ठाकरे आणि वेदिका ठाकरेंचा  खेळ  ठाणे ग्रामीण संघाचा पराभव टाळू शकला नाही. अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघाच्या मुलींनी धुळे संघाचे आवाहन ४५-३१ असे परतवून लावले.साक्षी रावडेआणि वैभवी जाधवने पुणे ग्रामीण संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. रितिका फुलरंग आणि प्रज्ञा गंबरने धुळे संघाकडून चांगला खेळ केला.

टॅग्स :thaneठाणेKabaddiकबड्डी