शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

आरक्षणबदलासाठी अंबरनाथमध्ये घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:00 AM

पालिका निवडणूक : इच्छुकांकडे केली जातेय लाखोंची मागणी

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : निवडणुकीची आरक्षण सोडत ही १८ फेब्रुवारीला पालिका कार्यालयात होणार आहे. मात्र, त्याआधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची गणिते तयार करून त्या अनुषंगाने काही नेतेच घोडेबाजार करत आहेत. आरक्षण पडणार नसले तरी त्या प्रभागावर आरक्षण पडणार, असे भासवत आरक्षण बदलून देतो, असे सांगून १० ते १५ लाखांची मागणी केली जात आहे. तर, काही राजकीय नेते निवडणूक आयोगाकडे आपली खूप ओळख असल्याचे दाखवत इच्छुकांकडे पैशांची मागणी करत आहेत.अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांचे आरक्षण हे प्रभागातील लोकसंख्येच्या गणितावर अवलंबून आहे. ज्या प्रभागात एससी, एसटी यांची लोकसंख्या जास्त आहे, त्या प्रभागात आरक्षणही चक्राकार पद्धतीने पाडण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून आरक्षण बदलण्याचे काम सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काही नेते या आरक्षणाच्या गणितावर पैशांचा बाजार मांडत आहे.कोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण पडणार, याचा आकडेवारीनुसार अंदाज काढणे सोपे झाले आहे. गुरुवारी दुपारी एसीसी आणि एसटीची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली. त्यातच जनगणनेतील ब्लॉक आणि त्याची लोकसंख्याही वर्ग केलेली आहे. त्या ब्लॉकनुसार आरक्षण बदलून देतो, असे सांगून पैशांची मागणी केली जात आहे.मुळात अनेक इच्छुक उमेदवारांना आकडेवारीची गणितेच माहीत नसल्याने तेही भीतीपोटी या आमिषाला बळी पडत आहेत. आपली पाच वर्षांची मेहनत वाया जाण्यापेक्षा काही जुगाड होतो का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक हे पैसे खाऊ राजकारण्यांचे बळी पडले आहेत. काही कंत्राटदारही त्याच नीतीचा अवलंब करून पैसे उकळण्याचे काम करत आहेत.याआधी निवडणूक आयोग जे आरक्षण देणार ते मान्य करून पुढे चालत होते. मात्र, दोन दिवसांत आरक्षणबदलाची आणि आरक्षणाचे ‘सेटिंग’ होते का याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार चिंतेत आहे.आरक्षणाची हेराफेरी झाल्यास काही अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मांडलेल्या बाजाराचे सर्व खापर आता अधिकाºयांवर फोडले जाण्याची शक्यता आहे.बदलापूरमध्ये अद्याप शांतताबदलापूर : आरक्षणात बदल करण्यासंदर्भातील चर्चा ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये सुरू आहे, तशी कोणतीही चर्चा बदलापूरमध्ये अद्याप तरी रंगात आलेली नाही. बदलापुरातील राजकीय नेत्यांनी मानसिकता तयार ठेवल्याने जे आरक्षण पडेल, ते मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पैशांच्या जोरावर आरक्षण बदलण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत नाही.च्दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला काढली जाणार होती. मात्र ही सोडत पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने तोंडी आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र ही पुढे ढकलण्यात आलेली तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. निवडणूक आयोगाचे सातत्याने बदलणारे आदेश हे संभ्रम निर्माण करणारे ठरत आहेत. तर दुसरीकडे वेळापत्रक आणि आदेश सातत्याने बदलत गेल्याने आयोगावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात रंगली आहे.