प्रसंगावधान राखून गरोदर मातेला इस्पितळात नेलेल्या रिक्षाचालकाचा सन्मान

By अनिकेत घमंडी | Updated: October 2, 2023 19:06 IST2023-10-02T19:06:19+5:302023-10-02T19:06:43+5:30

सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

Honoring the rickshaw puller who took the pregnant mother to the hospital with care | प्रसंगावधान राखून गरोदर मातेला इस्पितळात नेलेल्या रिक्षाचालकाचा सन्मान

प्रसंगावधान राखून गरोदर मातेला इस्पितळात नेलेल्या रिक्षाचालकाचा सन्मान

डोंबिवली: गेल्या आठवड्यात कल्याण पूर्व रेल्वे स्टेशन स्कायवॉक वरून एक गरोदर महिला रुक्मिणी बाई हॉस्पिटल कल्याण पूर्व येथे जात असतांना सदर महिलेने स्काय वॉक वरतीच नवजात बाळाला जन्म दिला.

अशा प्रसंगी प्रसंगावधान दाखवून रिक्षा चालक संजय जगताप व त्यांचे इतर रिक्षा चालक सहकारी यांनी सदर महिलेस व बाळाला सुखरूप खाजगी रुग्णवाहिनीतून हॉस्पिटल येथे भरती केले, त्यांच्या प्रसंगावधानाचा सन्मान वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार।धर्माधिकारी यांनी।सोमवारी केला.

शहर वाहतूक उपविभाग कोळशेवाडी हद्दीत सहा ते सात दिवसापूर्वी ही घटना घडली।होती. रिक्षा चालकांच्या या सेवाभावी प्रवृत्तीचे धर्माधिकारी यांच्यासमवेत कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी कोळसेवाडी वाहतूक उप विभाग कार्यालय, चक्कीनाका येथे पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन कौतुक व अभिनंदन केले व यापुढेही असेच चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Honoring the rickshaw puller who took the pregnant mother to the hospital with care