जिल्ह्यातील शिक्षकांचा आज सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST2021-09-05T04:46:47+5:302021-09-05T04:46:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उद्या, रविवार, दि. ५ सप्टेंबर ...

Honoring the teachers of the district today | जिल्ह्यातील शिक्षकांचा आज सन्मान

जिल्ह्यातील शिक्षकांचा आज सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उद्या, रविवार, दि. ५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रत्येकी पाच शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

येथील मो. ह. विद्यालयात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री या कार्यक्रमास कपिल पाटील, नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास राहणार आहेत. राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार आदीं उपस्थित राहणार आहेत.

..............

वाचली

Web Title: Honoring the teachers of the district today