अभिनय कट्ट्याकडून सुइणींंचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST2021-03-09T04:43:30+5:302021-03-09T04:43:30+5:30

ठाणे : अभिनय कट्ट्यावर दरवर्षी विविध क्षेत्रांत चमकमदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात येतो. ‘अभिनय कट्टा ...

Honoring of midwives from Abhinaya Katta | अभिनय कट्ट्याकडून सुइणींंचा सन्मान

अभिनय कट्ट्याकडून सुइणींंचा सन्मान

ठाणे : अभिनय कट्ट्यावर दरवर्षी विविध क्षेत्रांत चमकमदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात येतो. ‘अभिनय कट्टा - रणरागिणी पुरस्कार’ हा समाजातील महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. यंदा कोरोनाचे सावट असल्याने सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करून केवळ पुरस्कारप्राप्त माउलींना व्यासपीठावर निमंत्रित करून हा सन्मान देण्यात आला. या वर्षीच्या पुरस्काराचे महत्त्व म्हणजे समाजातील दुर्लक्षित अशा सुइणींचा तसेच आई व लहान बाळांची मालिश करणाऱ्या माउलींचा सन्मान करण्यात आला.

या वेळी निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सुरेखा भोसले, भारती शिर्के, सविता वांडकर, विटाबाई शिंदे, निर्मला पवार, शोभा साळुंखे, स्मिता सालीयन, मंगला जाधव, राधा मालुसरे, बाईजाबाई म्हस्के, अनसूया आंब्रे, ज्योती सुंभे या माउलींना ‘अभिनय कट्टा : रणरागिणी पुरस्कार २०२१’ या मानाच्या पुरस्काराने दिव्यांग कला केंद्र संचालिका संध्या नाकती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील या क्षेत्रात सेवा देणाऱ्या सर्व माउलींना अभिनय कट्ट्यातर्फे मानाचा मुजरा, असे मत अभिनय कट्ट्याचे संचालक व पुरस्कार सोहळ्याचे आयोजक किरण नाकती यांनी व्यक्त केले.

-----------------------------------------

फोटो मेलवर.

Web Title: Honoring of midwives from Abhinaya Katta