कोविड योद्धांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST2021-03-10T04:40:25+5:302021-03-10T04:40:25+5:30

कल्याण : कोरोनाकाळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या केडीएमसीतील महिला अधिकाऱ्यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मंगळवारी विशेष सन्मान करण्यात आला. ...

Honoring the Covid Warriors | कोविड योद्धांचा सन्मान

कोविड योद्धांचा सन्मान

कल्याण : कोरोनाकाळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या केडीएमसीतील महिला अधिकाऱ्यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मंगळवारी विशेष सन्मान करण्यात आला.

निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन कल्याण-डोंबिवली या नोंदणीकृत पत्रकार संघाने मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यातर्फे शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सुहासिनी बडेकर, रुक्मिणीबाई रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा टिके, पाटकर आरोग्य केंद्र प्रमुख अनुपमा साळवे, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आदींचा तुळशीचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार संघ नोंदणीकृत झाल्याबद्दल संघाचे अध्यक्ष किशोर पगारे यांचाही सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोरोनावर मात करणारे पत्रकार स्वप्निल शेजवळ, आतिश भोईर आणि शुभम साळुंखे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

--------

Web Title: Honoring the Covid Warriors