भाजपच्या त्या दोन कार्यकर्त्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:03+5:302021-08-26T04:43:03+5:30

डोंबिवली : शिवसेनेचे आमदार व ज्येष्ठ नेत्यांशी मंगळवारी कल्याण पश्चिमेतील पक्ष कार्यालयात दोन हात करणारे भाजप कार्यकर्ते प्रताप टूमकर ...

Honor those two BJP workers | भाजपच्या त्या दोन कार्यकर्त्यांचा सन्मान

भाजपच्या त्या दोन कार्यकर्त्यांचा सन्मान

डोंबिवली : शिवसेनेचे आमदार व ज्येष्ठ नेत्यांशी मंगळवारी कल्याण पश्चिमेतील पक्ष कार्यालयात दोन हात करणारे भाजप कार्यकर्ते प्रताप टूमकर व वैभव सावंत यांचा बुधवारी आमदार गणपती गायकवाड यांनी सन्मान केला.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या कथित वक्तव्यानंतर कल्याण पश्चिमेच्या भाजप कार्यालयावर आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेचे नेते बंड्या साळवी यांनी पंचवीस कार्यकर्त्यांसह हल्ला केला होता. त्याचा या दोघांनी निडरपणे प्रतिकार केल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. यावेळी मंगळवारी झालेल्या हल्ल्याचा निषेध करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी गायकवाड, कांबळेंसह शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी, स्वप्निल काटे, मिहिर देसाई अनेक कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आले होते.

------------

Web Title: Honor those two BJP workers