शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅपद्वारे लग्नाचे आमिष; फसवणूक करणाऱ्यास ठोकल्या बेड्या, लखनौच्या कॉल सेंटरवर ठाणे पोलिसांची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:38 IST

Thane Crime News: हनी ट्रॅपद्वारे फसवणूक करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक  फसवणूक करणाऱ्या जैद खान (२४) आणि यातील सूत्रधार एजाज अहमद एम्तियाज अहमद ऊर्फ फहहाद (३२) या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली.

ठाणे - हनी ट्रॅपद्वारे फसवणूक करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक  फसवणूक करणाऱ्या जैद खान (२४) आणि यातील सूत्रधार एजाज अहमद एम्तियाज अहमद ऊर्फ फहहाद (३२) या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामधील एजाज याला कारमधून पळून जात असताना पाठलाग करून पकडले.  लखनौच्या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.

जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर बनावट आयडी बनवून मुंब्रा भागातील  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत भामट्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून तिच्या बँक खात्यातून १३ लाख ५४ हजार ९८१ रुपये ऑनलाइन घेतले.  तिच्याशी लग्न न करताच तिची फसवणूकही केली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात १० ऑक्टोबर  २०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकाने जीवनसाथी या वेबसाइटवरून  ई- मेल आयडी, तक्रारदार तरुणीची माहिती मिळविली. त्याआधारे ९ जानेवारी रोजी जैदला भोपाळमध्ये शोध घेऊन अटक केली. 

पाच किलोमीटरपर्यंत केला पाठलागजैदच्या चौकशीत सूत्रधाराच्या मोबाइलसह इतर माहिती मिळाली. त्याच्या लोकेशनच्या आधारे लखनौमध्ये एका कॉल सेंटरवर  पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावला. पोलिसांच्या सापळ्याची चाहूल एजाजला लागल्यानंतर त्याने एका वाहनातून पळ काढला. त्यावेळी सुरवाडे यांच्या पथकाने त्याला पाच किलोमीटर अंतर कारने पाठलाग करून पकडले.  

सावजासाठी कॉलसेंटरचा वापर या भामट्यांनी अडीच हजार चौरस फुटांचे कॉलसेंटर थाटले हाेते. कॉलसेंटरमधील मुले-मुली  प्रसंगी अश्लील व्हिडीओ दाखवून सावज हेरत होती. त्यानंतर  गिफ्ट पाठविल्याचे सांगून त्याच गिफ्टसाठी कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली ऑनलाइन  पैसे घेत होते. काहींना अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची  भीती दाखवूनही पैसे घेतले जात होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेhoneytrapहनीट्रॅप