शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या प्रवाशाचा प्रामाणिकपणा: रिक्षात राहिलेले अन्य प्रवाशाचे दागिने केले परत

By जितेंद्र कालेकर | Updated: July 13, 2018 21:56 IST

रिक्षात घरी जाण्यासाठी बसल्यानंतर एक बॅग विठ्ठल चिंचोलकर यांना मिळाली. यात मोबाईल आणि सोनसाखळी होती. ती रिक्षा चालकाचीही नसल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी ती नौपाडा पोलिसांच्या मार्फतीने संबंधिताला परत केली.

ठळक मुद्देएक हजारांचे बक्षीस देऊन नौपाडा पोलिसांनी केला सत्कारजांभळी नाका येथील घटना ‘लोकमत’च्या बातमीने मिळाली प्रेरणा

जितेंद्र कालेकरठाणे: रिक्षा चालक आणि विठ्ठल चिंचोळकर या प्रवाशाच्या प्रामाणिकपणामुळे दयानंद कांबळे या अन्य एका प्रवाशाचा मोबाईल आणि दीड तोळयांची सोन्याची चैन असलेली बॅग शुक्रवारी रात्री परत मिळाली. त्यांच्या सामानाची ओळख पटवून नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांच्या हस्ते त्यांना ती सुपूर्द करण्यात आली. तर पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी चिंचोळकर यांचा पोलीस ठाण्यात छोटेखानी सत्कारही केला.घोडबंदर रोड, मानपाडा येथे राहणारे दयानंद कांबळे हे पत्नी आणि आईसह जांभळी नाका येथे शुक्रवारी रिक्षाने सायंकाळी खरेदीसाठी गेले होते. ते रिक्षातून खाली उतरले त्यावेळी त्यांच्याजवळील एक बॅग रिक्षातच राहिली. त्यानंतर त्याच रिक्षामध्ये चिंतामणी ज्वेलर्स येथून गॅस दुरुस्तीचे काम करणारे चिंचोळकर हे अन्य प्रवासी ज्ञानसाधना कॉलेजजवळील आपल्या घरी जाण्यासाठी बसले. तेंव्हा रिक्षात राहिलेल्या बॅगेबाबत त्यांनी रिक्षा चालकाला विचारणा केली असता, ती त्याची नसल्याचे त्याने सांगितले. चिंचोलकर यांनी रिक्षा तशीच नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यास सांगून बॅगेतील किंमती ऐवजासह ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्याकडे जमा केली. तोपर्यंत बॅगेचे मालक कांबळे हेही बॅग हरविल्याची तक्रार देत नौपाडा पोलीस ठाण्यात आले. अवघ्या काही तासातच त्यांना ३० हजारांची सोनसाखळी आणि मोबाईल असा ४० हजारांचा ऐवज सुखरुप परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.चिंचोळकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जाधव यांनी त्यांना तात्काळ एक हजारांचे रोख बक्षिस देऊन त्यांचा सत्कार केला. सहायक पोलीस आयुक्त सायगावकर आणि उपायुक्त स्वामी यांनीही त्याचे कौतुक केले. गुरुवारी एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. हीच बातमी वाचून आपल्याला प्रेरणा मिळाल्याने आपण हा ऐवज तातडीने पोलीस ठाण्यात जमा केल्याचे चिंचोळकर यांनी पोलिसांना सांगितले. ज्या रिक्षात ही बॅग राहिली त्याने मात्र आपले यात काहीच श्रेय नसल्याचे सांगत काहीच ओळख न सांगता तिथून निघून गेला.

टॅग्स :thaneठाणेGoldसोनंpassengerप्रवासी