'त्या' सजग प्रवाशाच्या एका ट्विटमुळे वाचलं 26 मुलींचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 10:48 AM2018-07-07T10:48:13+5:302018-07-07T13:26:18+5:30

रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

after a passenger tweet 26 girls rescued from train in up | 'त्या' सजग प्रवाशाच्या एका ट्विटमुळे वाचलं 26 मुलींचं आयुष्य!

'त्या' सजग प्रवाशाच्या एका ट्विटमुळे वाचलं 26 मुलींचं आयुष्य!

googlenewsNext

नवी दिल्ली : रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशाला संशय आला असता त्याने केलेल्या एका ट्विटनंतर गोरखपूरजवळ जीआरपी आणि आरपीएफने या सर्व मुलींची सुटका केली. 

पाच जुलै रोजी मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला  एस-5 या कोचमध्ये जवळपास 25 मुली रडताना दिसल्या. मुली रडत असताना मुलींच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि भीती लक्षात येताच त्या सजग प्रवाशाने याबाबतचे एक ट्विट केले होते. प्रवाशाच्या या ट्विटची दखल घेत वाराणसी आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. गोरखपूर येथील जीआरपी विभागाने चाइल्डलाइन तसेच पोलिसांच्या तस्करीविरोधी पथकाच्या समन्वयाने ही कारवाई सुरू केली. अवध एक्सप्रेस कापतागंज रेल्वे स्थानकात पोहोचताच साध्या वेशातील आरपीएफचे दोन जवान ट्रेनमध्ये चढले.

कारवाई दरम्यान 22 आणि 55 वर्षांच्या दोन पुरुषांसह 26 अल्पवयीन मुली प्रवास करताना आढळल्या. बिहारमधील पश्चिम चंपारण येथील हे सर्वजण रहिवासी असल्याची माहिती समोर आली. तसेच या सर्व मुलींना नारकटिक्यागंज येथून इदगाह येथे नेले जात होते. याबाबत मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी  समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळेच अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. या सर्व मुली 10 ते 14 वर्षे वयोगटातील  आहेत. तसेच याप्रकरणी दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून मुलींच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: after a passenger tweet 26 girls rescued from train in up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.