शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे, ठाणे महापालिकेचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:35 IST

TMC News : खारटन रोड येथील लफाट चाळीत राहणाऱ्या १९१ सफाई कर्मचाऱ्यांना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मालकीहक्काची घरे देण्यात येणार आहेत.

ठाणे  - खारटन रोड येथील लफाट चाळीत राहणाऱ्या १९१ सफाई कर्मचाऱ्यांना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मालकीहक्काची घरे देण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत येथील कर्मचाऱ्यांनी सदनिका रिकामी केली असल्यामुळे त्यांच्या पगारातील घरभाडे व सेवाशुल्क माफ करण्यात येणार असल्याचे पत्र बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १० कर्मचाऱ्यांना दिले. त्यावेळी महापौरांनी ही माहिती दिली.या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे, नगरसेविका नम्रता कोळी, विमल भोईर, मालती पाटील, माजी नगरसेवक पवन कदम, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, प्रवीण वीर, कामगार नेते बिरपाल भाल, तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.खारटन रोड येथील महापालिकेच्या मालकीहक्क असलेल्या जागेवर पीपीपी  अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. याठिकाणी राहत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येत होते; परंतु ठाणे महापालिकेच्या महासभेने याबाबत एकमताने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सद्य:स्थितीत नवीन इमारतीच्या बांधणीसाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी केली असल्यामुळे त्यांच्या पगारातील घरभाडे भत्ता व सेवाशुल्क  कपात न करण्याबाबतचे पत्र महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते  देण्यात आले. प्रश्न सोडवण्यासाठी केला पाठपुरावा जसजसे या चाळीतील घरे सफाई कर्मचारी रिकामी करतील त्याप्रमाणे त्यांचेही घरभाडे कपात केले जाणार नाही. यासाठी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे, स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी, माजी नगरसेवक पवन कदम, जयेंद्र कोळी यांनी सतत प्रशासनासोबत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांचा हा लढा यशस्वी केला. त्याबद्दल महापौरांनी त्यांचेही आभार मानले.  दिव्यांगांनाही मिळणार कायमस्वरूपी घरे  ठाणे : दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाच्या धोरणानुसार ‍दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. दिव्यांग व्यक्तींसाठी मालकी हक्काची घरे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या घरांचे चावीवाटपदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले होते. परंतु, कोविडमुळे त्यांना ताबा देण्यास विलंब झाला. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे येत्या ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिव्यांगांना या घरांचा ताबा देण्यात येणार असून त्यांना कायमस्वरूपी घरे देणारी ठाणे ही पहिली महानगरपालिका असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.            दिव्यांग व्यक्तींचे योग्य प्रकारे पुनर्वसन व्हावे, यासाठी दिव्यांग व्यक्तींकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले होते. याची योग्य छाननी करून एकूण १९० दिव्यांग पात्र ठरविले आहेत. याचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीवाटप केले होते. परंतु, कोविडमुळे हे काम प्रलंबित होते.  तसेच  म्हस्के यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या सदनिकांमधील साहित्य तातडीने हटवून सदनिका तातडीने संबंधितांना उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांना कळविले होते. त्यानुसार, त्यांनी दिव्यांगांना सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका