दसरा मेळाव्याच्या दुष्टीने कायदा सुव्यवस्था चोख, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By अजित मांडके | Published: October 3, 2022 10:17 PM2022-10-03T22:17:06+5:302022-10-03T22:17:43+5:30

आपला महाराष्ट्र चिंतमुक्त कर ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे.

Home Minister Devendra Fadanvis clearly said that law and order is the evil of Dussehra gathering | दसरा मेळाव्याच्या दुष्टीने कायदा सुव्यवस्था चोख, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

दसरा मेळाव्याच्या दुष्टीने कायदा सुव्यवस्था चोख, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

ठाणे : दसऱ्या मेळाव्या निमित्ताने मुंबईत जीं लाखो लोकं येणार आहेत. त्यापासून कोणतीही  अडचण  नाही. पण त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये. याकरिता आम्ही दक्षता घेऊ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ठाण्यात केलं. टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी तें सोमवारी रात्री सपत्नी ठाण्यात आलें होते.     

आपला महाराष्ट्र चिंतमुक्त कर ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. असे मागने मी टेंभी नाक्याच्या देवी कडे मागितल्याच त्यांनी सांगितले. तसेच आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी जे  शिवसेना -भाजपा युतीचे सरकार स्थापन केले आहे. या सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे काम करण्यासाठी आई कडे शक्ती मागितली. तर यावेळी त्यांना पत्रकारांनी राज्यातील उद्योगधंदे इतर ठिकाणी जात आहेत. याबाबत विचारले असता रोज तेच तेच काय विचारतात  काही तरी नवीन विचारा असे म्हणून त्याला उत्तर देण टाळले. तसेच मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या दुष्टीने आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार आहोत. राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नसून त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेऊ.असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस हीं होत्या. त्यांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांनी केलं.

Web Title: Home Minister Devendra Fadanvis clearly said that law and order is the evil of Dussehra gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.