शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:08 IST

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली.

ठाणे : ठाणे, पालघररायगड जिल्ह्यांतील घर खरेदीदारांना बिल्डरांकडून नुकसान भरपाईपोटी येणे असलेली २०० कोटींहून अधिक रक्कम वसूलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून हलगर्जी सुरू आहे. यामुळे महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिलेले आदेश कागदावर राहिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली.

ठाण्यात घर खरेदीदारांचे नुकसान भरपाईचे १४३ कोटी ६७ लाख रुपये अडकले आहेत. ठाण्यातील केवळ पाच बिल्डरांकडे १०७ कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम वसूल करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तर ७५ टक्के रक्कम वसूल होईल. 

ठाणे जिल्ह्यात ९८ प्रकल्पांत २२२ घरखरेदीदार तक्रारदारांचे १५५ कोटी ३२ लाख वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत १५ प्रकल्पांत २७ घर खरेदीदारांचे केवळ ११ कोटी ६५ लाख वसूल झाले आहेत.

पालघरमध्ये बिल्डरकडे २८ कोटी थकले

पालघर जिल्ह्यात ३३ प्रकल्पांकडे ७९ जणांचे २८ कोटी १९ लाख वसूल व्हायचे आहेत. येथेही फक्त तीन बिल्डर्सकडे १२ कोटी अडकले असून ते वसूल झाल्यास ४२ टक्के वसुली होईल.

जिल्ह्यात ३९ प्रकल्पांत ८८ घरखरेदीदारांचे ३२ कोटी ७५ लाख रुपये वसूल व्हायचे होते. यापैकी सहा प्रकल्पांत नऊ घरखरेदीदारांचे चार कोटी ५६ लाख वसूल झाले.

जिल्ह्यात कर्म ब्रह्मांड अँफोरडेबल होम्स प्रा. लि. (९ कोटी २३ लाख), विनय युनिक रिअलटर्स (१ कोटी ८७लाख), शांती रिअल्टी अँड लाइफस्पेस (१ कोटी ३५ लाख) या प्रबिल्डरांच्या वसुलीकडे सौनिक यांनी लक्ष वेधले.

रायगडमध्ये ३३ प्रकल्प

रायगड जिल्ह्यात ३३ प्रकल्पांतील ६५ घरखरेदीदारांचे ३० कोटी २२ लाख रुपये वसूल व्हायचे आहेत. येथेही पाच बिल्डर्सकडे १९ कोटी अडकलेले असून ही रक्कम वसूल केल्यास एकूण रकमेच्या ६२ टक्के वसुली होणार आहे.

जिल्ह्यात १९ प्रकल्पांत ५९ खरेदीदारांचे ७ कोटी ८७ लाख वसूल झाले. तर वेदांत रिअलटर्स (२ कोटी), एक्सरबिया वराई डेव्हलपर्स प्रा. लि. (१३ कोटी ८५ लाख), एन. के. भूपेशबाबू (१कोटी), स्कायलाइन सफायर (दीड कोटी), युनिव्हर्सल बिल्डर अँड डेव्हलपर्स (७५ लाख) हे प्रमुख थकबाकीदार आहेत.

ठाण्यातील थकबाकीदार

ठाण्यात निर्मल डेव्हलपर्स (२१ कोटी १९ लाख), सेठ डेव्हलपर्स प्रा. लि. (२६ कोटी ८८ लाख), सुशीला मालगे (१८ कोटी ३० लाख), टी भिमजियानी रियलिटी प्रा. लि. (३५ कोटी १९ लाख), अँको हाऊसिंग इंडिया प्रा. लि. (सहा कोटी) या प्रमुख भरपाई थकवलेल्या बिल्डरांबाबत सौनिक यांनी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना पत्र लिहिले.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017palgharपालघरRaigadरायगड