वाहनचोरीसह घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST2021-06-17T04:27:35+5:302021-06-17T04:27:35+5:30

ठाणे : वाहनचोरीसह घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या बाळा गंगाधर कवळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली ...

Home burglar arrested with vehicle theft | वाहनचोरीसह घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

वाहनचोरीसह घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

ठाणे : वाहनचोरीसह घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या बाळा गंगाधर कवळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लॅपटॉप, दोन रिक्षा आणि एक मोटारसायकल, एक दुचाकी, असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली भागात घरफोडी, तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी या चोरीच्या तपासाचा आदेश कासारवडवली पोलिसांना दिला होता. सराईत गुन्हेगार बाळा कवळे याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कवळे याला वागळे इस्टेट भागातून १५ जून रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने कासारवडवली भागातून लॅपटॉप, रिक्षा आणि मोटारसायकल चोरी केल्याची, तसेच वर्तकनगर भागातूनही रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून हे चारही गुन्हे उघड झाले असून, तीन वाहने आणि एक लॅपटॉपही जप्त केला आहे.

Web Title: Home burglar arrested with vehicle theft