‘टोरंट’च्या निषेधार्थ शुक्रवारी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:46 IST2020-01-01T00:45:39+5:302020-01-01T00:46:41+5:30
आगरी युवक संघटनेतर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन

‘टोरंट’च्या निषेधार्थ शुक्रवारी धरणे
ठाणे : महावितरणने टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा व शीळ भागातील वीजपुरवठ्याच्या दिलेल्या ठेक्याला माजी ऊर्जामंत्र्यांनी स्थगिती दिलेली असतानाही कंपनीचे कामगार अनधिकृतरित्या वीजपुरवठ्यात हस्तक्षेप करीत असून महावितरणच्या कामगारांना दमदाटी करीत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आगरी युवक संघटनेतर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, माजी ऊर्जामंत्र्यांनी टोरंटला वीजपुरवठा करण्यात स्थगिती दिली असल्याकडे लक्ष वेधले आहे.