शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून ठाण्यात महागाईविराेधात ‘श्री राम, जय राम’चे होर्डिंग्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:48 IST

"प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे."

ठाणे  :  मनसेने ठाण्याच्या विविध भागांत ‘चलो अयोध्या’चे बॅनर लावले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ‘श्री राम, जय राम, जय जय राम’चे हाेर्डिंग लावून जीवघेण्या महागाईकडे लक्ष वेधले आहे. प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या सभा घेणाऱ्यांनी आपल्या सभेतून याबाबत जाब विचारण्याचे धैर्य दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीने शहरभर इंधनाचे तुलनात्मक दर दर्शवणारे फलक लावले आहेत. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ७१   रुपये होता, तर आता ताे १२१ रुपयांच्या घरात आहे. २०१४ मध्ये डिझेल ५६ रुपये होते. आता तो दर १०५ रुपये झाला आहे. २०१४ मध्ये ४१० रुपयांत मिळणारा गॅस सिलिंडर आता ९५० रुपये झाला आहे. या महागाईमुळे आता जनतेला ‘श्री राम, जय राम, जय जय राम’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे फलक सध्या ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाजप कार्यालयाच्या समोरच असा होर्डिंग्ज लावून भाजपच्या येथील नेत्यांनी पंतप्रधान मोदींपर्यंत जनतेचा आक्राेश पोहाेचवावा,  असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.

दरम्यान,  महागाईने गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्याची फिकीर कोणालाही नाही. इंधन दरवाढीविरोधात आंदोलने करून सत्तेवर आलेल्या भाजपला आपल्या सत्ताकाळात हे वाढलेले दर दिसत नाहीत, यासारखे दुर्दैव कोणते असणार? मोदी या महागाईबाबत कोणतेही भाष्य करीत नाहीत, तर राज्यात मोठ्या सभा घेणारे काही नेते धार्मिक उन्माद माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘राज तिलक की करो तयारी, आ रहा है भगवाधारी’, असे म्हणत महागाईवर जनतेचे लक्ष जाऊ नये, यासाठी धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप परांजपे यांनी केला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेthaneठाणेInflationमहागाई