शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवलीत सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:34 IST

डोंबिवली: हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ‘सायकल रॅली’चे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोरून मोठ्या जल्लोषात निघाली. त्यासाठी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पर्यावरण प्रेमी होते म्हणून त्यांची आठवण ...

ठळक मुद्दे शहरशाखेच्या वतीने करण्यात आले होते आयोजन प्रदुषण रोखा शहर वाचवा चा सायकलपटूंनी दिला नारा

डोंबिवली: हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ‘सायकल रॅली’चे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोरून मोठ्या जल्लोषात निघाली. त्यासाठी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पर्यावरण प्रेमी होते म्हणून त्यांची आठवण आणि समाजात जनजागृती करण्यासाठी ह्या रॅली चे आयोजन केल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.सायकल चालवा प्रदुषण रोखा, सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा आरोग्य राखा असा संदेश देत शहरातील २०० सायकलपटूंनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रदुषण मुक्तीचा नारा दिला. त्या उपक्रमाला शहरातील सामाजिक संस्थांसह कल्याण सायकल क्लब व परिसरातील सायकलपटू दखिल सहभागी झाले होते. डोंबिवली सायकल क्लबच्या सदस्यांना त्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. डोंबिवली सायकल क्षेत्रात एक प्रेरणादायी व्हावी यासाठी एक नवा पायंडा घालावा असे आवाहन मोरे यांनी यावेळी केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सायकलपटूंना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले. त्यावेळी रॅलीचे आयोजक तात्या माने, प्रा. निषाद पवार, ललित शाईवाले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.असा होता सायकल रॅली चा मार्ग : शिवसेना मध्यवर्ती शाखा - महापालिका कार्यालय - सर्वेश सभागृह - ब्राह्मण सभागृह- फडके रोड- गणपतीमंदिर चौक - नेहरू मैदान - आंध्र बॅक - पेंडसे नगर - मंजुनाथ शाळा चौक - पाथर्ली शंकर मंदिर - गोग्रास वाडी - आईस फॅक्टरी -मानपाडा रोड - चार रस्ता - डोंबिवली पश्चिम दिनदयाळ चौकात रॅलीची समाप्ती झाली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदे