Hijacked Ashik gets bail in eight days | अपहृत आशिकची आठ दिवसांत झाली सुटका
अपहृत आशिकची आठ दिवसांत झाली सुटका

ठाणे : भिवंडीतून अपहरण झालेल्या एक वर्षीय आशिक (बाबू) चंदुल हरजन याच्या अपहरणप्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने रोहित प्रदीप कोटेकर (२३) याला उत्तरप्रदेशातून अटक करून हा गुन्हा आठ दिवसात उघडकीस आणला. तर त्याचा साथीदार सुरज सोनी हा फरार आहे. हे दोघेही सराईत वाहनचोरटे आहेत. झालेले कर्ज फेडण्याकरीता हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. बुधवारी ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते आशिकला आईवडिलांच्या स्वाधीन केले.

३ जुन रोजी रात्री आशिक हा धामणकरनाका पुलाखाली आईच्या कुशीमध्ये तो झोपला होता. याचदरम्यान फरार सुरज याने अटकेतील रोहित याच्या सांगण्यावरून त्याचे अपहरण केले. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भिवंडीतील नंदीनाका येथील रोहित कोटेकर याला सोमवारी १० जुलै रोजी सकाळी अटक केली. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार व वाहन चोरी करणारा रेकॉर्डवरील सुरज सोनी याच्या मदतीने केल्याची कबुली देऊन ३ ते ४ लाखांचे कर्ज फेडण्याकरिता हा गुन्हा केल्याचे म्हटले आहे. त्याला येत्या १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस नाईक मेघना कुंभार या पथकाने उत्तरप्रदेशातील महाराजगंज येथे धाव घेऊन कारवाई केली होती.

आशिकला विकण्याचा आरोपींचा होता कट
एक महिलेला मूलबाळ होत नसल्याने तिने आरोपींक डे मूल दत्तक घ्यायचे आहे असे सांगितले. दरम्यान, त्यांनी आशिकचे अपहरण करून त्याला विकण्याची तयारी केली होती. मात्र, तत्पूर्वी तो पोलिसांच्या जाळ्यात आला. रोहित हा आशिकला किती रुपयांना विकणार होणार होता हे तपासात कळेल.

हरजन कुटुंबीय फैजाबादचे
हरजन कुटूंबिय हे फैजाबादचे असून तीन ते चार वर्षांपासून भिवंडीत रमजान ईदच्या दिवसात उदरनिर्वाहासाठी येतात. या ते दिवसात सात ते आठ हजार रुपये कमाई करतात.

भिवंडी ते उत्तरप्रदेश प्रवास
आशिकच्या अपहरणानंतर त्याच दिवशी रोहितने त्याच्यासह उत्तरप्रदेश गाठले. तेथे त्याने ज्या महिलेला मूलबाळ होत नव्हते तिच्याकडे या घटनेनंतर त्यास ठेवले होते.


Web Title: Hijacked Ashik gets bail in eight days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.