शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हेरॉइनची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना, आणखी दोघांची धरपकड करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 23:11 IST

हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर त्याला हा माल पुरवणा-या मध्य प्रदेशातील गनी माऊ याच्यासह दोघांच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे.

ठाणे : हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर त्याला हा माल पुरवणा-या मध्य प्रदेशातील गनी माऊ याच्यासह दोघांच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. या दोघांकडून आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.अन्सारी याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानक परिसरात बुधवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून ३९ लाख २५ हजारांचे ३९२.५ ग्रॅम इतके हेरॉइन हस्तगत करण्यात आले. त्याने हा माल मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामाऊ परिसरातील गनी माऊ याच्याकडून आणल्याची कबुली दिली. ही माहिती मिळताच गोडसे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक धर्मराज बांगर, चंद्रकांत घाडगे आदींचे पथक गुरुवारी मध्य प्रदेशमध्ये रवाना झाले. शुक्रवारी या पथकाने मंदसौर पोलिसांची मदत घेऊन गनी माऊ याच्या घराचा शोध घेतला. मात्र, तो घरी आलेला नव्हता. त्याच्यासह आणखी दोघांचा या भागातून शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.२५ लाखांमध्ये किलोचा ‘सौदा’आंतरराष्टÑीय बाजारपेठेत किलोमागे करोडोंची किंमत असलेल्या या हेरॉइनची मध्य प्रदेशात मात्र किलोमागे अवघ्या २० ते २५ लाखांमध्ये घाऊक विक्री केली जात होती. २५ लाखांमध्ये एक किलो मिळालेल्या या हेरॉइनची पुढे अगदी ग्रॅममध्ये लाखाचा भाव लावून गनी माऊ आणि त्याचे साथीदार सोनू अन्सारी यासारख्या किरकोळ विक्रेत्याला त्याची विक्री करत होते. यात आणखी कोणती टोळी आहे, याचा तपास करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस