शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

तानसा अभयारण्यातील २१ हरणांचा कळप गायब, वन्यजीव विभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:47 IST

वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे.

शेणवा :  शहापूर तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या तानसा अभयारण्यातून चितळ प्रजातीच्या २१ हरणांचा कळप दिसेनासे झाला आहे. अचानक गायब झालेला हा हरणांचा कळप नेमका गेला कुणीकडे, याबाबत वन्यजीव विभागाला थांगपत्ताही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही हरणे इतरत्र स्थलांतरित झाली? त्यांची शिकार झाली, की अन्न पाण्याविना मृत पावली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. लोकवस्तीकडे येणाऱ्या पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागण्याच्या घटना ताज्या असतानाच तानसा अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या हरणांच्या कळपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उरण येथील एका नेव्ही कॅम्पमध्ये बंदिस्त असलेल्या चितळ प्रजातीच्या २१ हरणांच्या कळपाला मुक्त संचार करता यावा, या उद्देशाने वन्यजीव विभागाने आठ वर्षांपूर्वी तानसा, वैतरणा, खर्डी, वाडा, परळी, सूर्यमाल अशा ३२० चौरस किमी विस्तीर्ण क्षेत्र असलेल्या तानसा अभयारण्यात सोडले होते. तानसा वनपरिक्षेत्रातील क्वारीपाडा जंगलात सोडण्यात आलेला पाणथळीच्या जागी दिसणारा हरणांचा कळप आता एक ते दीड वर्षापासून दिसेनासा झाल्याची माहिती वनकर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. 

सुरक्षेचा प्रश्न गंभीरहरणांचा हा कळप इतरत्र स्थलांतरित झाला आहे का, असेल तर कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहे ? आता न दिसणाऱ्या हरणांची शिकार झाली? की अन्न पाण्याविना मृत पावली, याबाबत शोध घेणे आवश्यक असून, या हरणांच्या सुरक्षेसह जंगलातील इतर पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

टॅग्स :shahapurशहापूर