शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील माहितीच्या मदतीने ठाणे पोलिसांनी घडविली पिता-पुत्राची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 03:00 IST

social media : एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने १३ वर्षीय मुलाची त्याच्या वडिलांशी महिनाभराने भेट घडवून आणली.

ठाणे -  एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने १३ वर्षीय मुलाची त्याच्या वडिलांशी महिनाभराने भेट घडवून आणली. नालासोपाऱ्यातून अचानक बेपत्ता झालेला आपला मुलगा पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ झळकले.सध्या ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत ‘मुस्कान -९’ ही लहान मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गतिमंद विशेष मुलाची त्रोटक माहिती २८ नोव्हेंबर रोजी मिळाल्यानंतर अवघ्या चारच तासांमध्ये त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट घडविण्यात या पथकाला यश आले.सलीम (नावात बदल) लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर बेकरीत काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी २८ ऑक्टोबर २०२० रोजी त्याला गावावरून नालासोपाऱ्यामध्ये आणले. ते त्याला घरात ठेवून कामाला जात होते. त्याच दरम्यान, तो घरातून अचानक बेपत्ता झाला. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इकडे १२ नोव्हेंबर रोजी तो कल्याण येथील खडकपाडा पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्याला उल्हासनगर बालसुधारगृहात दाखल केले. दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याची माहिती मिळाली. यामध्ये त्याचा लहानपणीचा जुना फोटो आणि केवळ नालासोपारा एवढीच त्रोटक माहिती होती. त्याआधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकातील पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंगारे आणि पोलीस नाईक प्रमोद पालांडे यांनी त्याचा उल्हासनगरच्या बालसुधारगृहात शोध घेतला. अवघ्या चार तासांत शोध पूर्ण करून सलीमला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. यानंतर पालकांच्या डाेळ्यात अश्रू तरळून त्यांनी पाेलिसांचे आभार मानले.चुकीच्या, अपूर्ण माहितीमुळे गोंधळहरवलेला मुलगा गतिमंद असून त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील रिक्षाने मुंबईत फिरत ४ डिसेंबर रोजी माटुंगा येथे आले होते. त्याचवेळी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने त्यांना मुलाची माहिती दिली. मुलाचा लहानपणीचा जुना फोटो त्यांनी पोलिसांकडे दिला होता. इकडे बालसुधारगृहामध्ये मुलाने चुकीचे नाव दिले. अशी संभ्रमाची माहिती असतानाही या मुलाला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात पथकाला यश आले. आपला मुलगा सुखरूप परत मिळाल्याने मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFamilyपरिवार