नगरसेवकाच्या समर्थकांनी घातला रुग्णालयात हैदोस
By Admin | Updated: March 23, 2017 01:21 IST2017-03-23T01:21:01+5:302017-03-23T01:21:01+5:30
रुग्णालयातून घरी परतत असताना कारचा दुचाकीस्वारांना धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून भाजपा नगरसेवकाच्या समर्थकांनी दोघांना

नगरसेवकाच्या समर्थकांनी घातला रुग्णालयात हैदोस
डोंबिवली : रुग्णालयातून घरी परतत असताना कारचा दुचाकीस्वारांना धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून भाजपा नगरसेवकाच्या समर्थकांनी दोघांना रुग्णालयात घुसून लाकडी दांडूके आणि तलवारीच्या सहायाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री शिवम हॉस्पिटलमध्ये घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
डोंबिवलीतील नवापाडा येथे राहणारा प्रसाद कीर आणि अजय शेलार हे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रु ग्णालयातून घरी आपल्या दुचाकीने शेलार नाका येथून कारने परतत होते. मात्र रस्त्यात त्यांच्या कारचा धक्का एका दुचाकीला लागला. त्यामुळे त्यावर बसलेला तरुण आणि तरुणी जखमी झाले. लागलीच प्रसाद व अजय यांनी त्यांना नजीकच्या शिवम रुग्णालयात नेले. अजय याने या घटनेची माहिती आपले वडील व काँग्रस माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि मामा दशरथ म्हात्रे यांना कळवली. तर रुग्णालयाने या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना कळवली.
त्याच दरम्यान जखमी झालेल्या मुलाने ही बाब भाजपा नगरसेवकाचे समर्थक विजय बाकडे यांनी कळवली. बाकडे याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. सदाशिव शेलार यांना रुग्णालयात पोहोचण्यास उशिर झाला मात्र, दशरथ म्हात्रे हे रुग्णालयात पोहचले. त्याचवेळी बाकडे आणि त्याचे साथीदार लाकडी दांडके , तलवार आणि काठ्या घऊन
रुग्णालयात घुसले. प्रसाद, दशरथ म्हात्रे यांना त्यांनी शिवीगाळ करत रुग्णालयातील खुर्चा आणि लाकडी दांडक्याने मारहाण करू न तेथून पळ काढला.
दशरथ म्हात्रे यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. तर प्रसाद किरकोळ जखमी झाले. या वेळी तेथे तलवारही आणल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयात घडल्याने रु ग्णांसह डॉकटरही भयभीत झाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्रसाद यांच्या फिर्यादीवरून लहू, करण उर्फ बाबू चौरिसया, रोहन ठाकूर ,सलीम, विजय बाकडे यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)