शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ठाणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:23 IST

२११ मि.मी. पावसाची नोंद, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली : सखल भागांत साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मंगळवारी रात्रीपासून ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या चोवीस तासांत २११ मि.मी. पावसाची नोंद झाली तर ठाणे शहरात १९६ मि.मी. पाऊस झाला.

मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या शहरांसह ग्रामीण भागात पावसाचा जोर बुधवारी दिवसभर कायम होता. बुधवारी सायंकाळी महापे परिसरात डोंगरावरून पाण्याचे लोट रस्त्यावर वाहून आल्याने या परिसराला समुद्राचे स्वरूप आले होते. त्यामुळे मुंबईहून डोंबिवली-कल्याणकडे येणारी वाहतूक मंदावली होती. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत १९६ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण २४.१ मिमी, मुरबाड २७.३ मिमी, भिवंडी १७.७ मिमी, शहापूर ८.४ मिमी, उल्हासनगर ५६ मिमी तर अंबरनाथ येथे ३२.९ मिमी पावसाची नोंद झाली.

पालघरमध्ये मुसळधारपावसाची हजेरीपालघर : जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात ‘आॅरेंज अ‍ॅलर्ट’ आधीच देण्यात आलेला होता. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात पाठवल्या नाहीत. वसई तालुक्यात नालासोपारा, राष्ट्रीय महामार्ग, वसई पश्चिम परिसरातील सखल भागांत पाणी साचले.

रायगडमध्ये पनवेल तालुक्यात सर्वाधिक पाऊसच्अलिबाग : मंगळवारी संध्याकाळपासून रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हाजेरी लावली आहे. रात्रभर पडणाºया पावसामुळे काही भागात पाणी साचले होते.च्सर्वाधिक पाऊस पनवेल तालुक्यात झाला असून त्यानंतर माथेरान, उरणमध्ये पडला तर परिसरातील डोंगराळ सुधागड, महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण समाधानकारक होते.च्एकूण १४८६.२० मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली आहे. सर्वांत कमी पाऊस पोलादपूर तालुक्यात ८ मि.मी. इतका पडला. नागोठण्याची अंबा नदी धोक्याच्या पातळीपासून तीन मीटर दूर आहे.च्कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीपासून दोन मीटर दूर आहे. बुधवारी दुपारपर्यंत महाड विभागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.नवी मुंबई शहराला पावसाने झोडपले : नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मंगळवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला असून शहरातील नेरूळ आणि बेलापूर विभागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरात सुमारे २२२.८६ मि.मी. पाऊस पडला. बेलापूर गाव, कोकण भवन, सिडको भवन आदी भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या भागातील बाजारपेठेत पाणी शिरल्याने इलेक्ट्रॉनिक, धान्य दुकानातील साहित्य खराब होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.कोयना धरण ओव्हरफ्लो!सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पनवेलमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस : पनवेल : पनवेल परिसराला मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. तब्बल ३०६ मि.मी. अशा रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली. खारघर, पनवेल शहर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल आदी ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. सायन - पनवेल महामार्गावर कळंबोली, ओरियनजवळील मार्ग पाण्यात गेला होता. सायन - पनवेल महामार्गावर खारघर टोल नाका येथे वाहतूककोंडी झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस