भिवंडीत पावसाची दमदार हजेरी ; ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:21 IST2021-07-19T13:19:42+5:302021-07-19T13:21:18+5:30

धामणकर नाका कल्याण रोड परिसरात साचलेल्या पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने व्यापारी हैराण झाले होते.

Heavy rains in Bhiwandi; The misery of the citizens due to stagnant water in some places | भिवंडीत पावसाची दमदार हजेरी ; ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची दैना

भिवंडीत पावसाची दमदार हजेरी ; ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची दैना

- नितिन पंडीत

भिवंडी- भिवंडी शहर व ग्रामीण भागात रविवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने सोमवारी शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची मोठी दैना उडाली होती. त्याचबरोबर भिवंडी वाडा रस्त्यावर नदीनाका , अंजुरफाटा ते पूर्णा, अंजुरफाटा ते कल्याणनाका , अंजुरफाटा ते खारबाव रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढतांना दुचाकी वाहने व रिक्षा बंद पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

रात्रभर कोसळलेल्या पावसाने शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट , छ.शिवाजी महाराज चौक , धामणकर नाका , कल्याणनाका, म्हाडा कॉलनी , ईदगा रोड , कारीवली दर्गा रोड , कमला हॉटेल ,गुलजार हॉटेल, निजामपुरा , राहनाळ , नारपोली , पद्मानगर , बस स्थानक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला . तर धामणकर नाका कल्याण रोड परिसरात साचलेल्या पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने व्यापारी हैराण झाले होते. तर नदीनाका व ईदगा रोड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास झाला. 

Web Title: Heavy rains in Bhiwandi; The misery of the citizens due to stagnant water in some places