शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये पावसाचा हाहाकार; भातसा, काळू व उल्हास या नद्यांना महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 12:16 IST

कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तीनही नद्यांना महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

उमेश जाधव

टिटवाळा-: खडवली येथील भातसा पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच भातयाच्या पुरामुळे खडवली नदीकाठच्या  इंदीरानगर, ज्यु, आदीवासी आश्रम शाळा परीसर, स्वामीसमर्थ मठ परीसर येथील ७० ते ८० घरात पुराचे पाणी शिरले आहे. नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले. पाण्याखाली गेलेल्या घरातील नागरिकांना येथील स्थानिक लोकांकडून बाहेर काढण्यात येत असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले असून त्यांच्या निवार्‍याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

दरम्यान रुंदी गावा जवळील  पुल रविवारी सकाळपासूनच पाण्याखाली गेले होता तो आतापर्यंत पाण्याखालीच आहे. यामुळे लगतच्या भागातील  रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, उशिद, भोंगळपाडा, दानबाव, पळसोली, हाल, काकडपाडा आदी गावांतील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच याच काळू नदीवर वासुंद्री गावा जवळील असणारा पुत्र देखील रविवारी सायंकाळपासून पाण्याखाली गेल्याने येथील सांगोडा, कोंढेरी, मोस, वासुंद्री व निंबवली या पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

कल्याण-मुरबाड महामार्गावर असणाऱ्या रायते गावाजवळ उल्हास नदीवरील पुलावरून देखील पुराचे पाणी गेले आहे. यामुळे या महामार्गावरील कल्याण- मुरबाड- नगर ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावर जागोजागी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तसेच या चंद्रहास नदीचे पाणी रायते, कांबा, वरप, आणे व म्हारळ येथील नदीकाठच्या घरात शिरले आहे. या नदीकाठच्या गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टिटवाळा रेल्व स्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर शिव मंदिरा लगत असणारा साकव या वरून पाच ते सहा फुट काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. ह्या कारणास्तव या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे तर रेल्वे स्थानक परिसरातील लोक अलीकडे अडकून पडली असल्याचे चित्र दिसून येते आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने येथील नारायण नगर रोडवर असणाऱ्या गणेश कृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत. तर सांडोडा रोड येथील २०० रूम पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सध्या पावसाचा जोर अजूनच वाढला असल्याने आणखीन पूरसदृश्य परिस्थिती  निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरriverनदी