शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:36 IST

‘मोडकसागर’चे दोन दरवाजे उघडले

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ मि.मी. पाऊस पडला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने एक हजार ४०८ नागरिकांचे स्थलांतर केले. मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तानसा धरणापाठाेपाठ गुरुवारी माेडकसागर धरण भरल्याने दाेन दरवाजे उघडले. भातसा धरणातील पाण्याचा काेणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

धरणातील पाणीसाठा 

भातसा धरणात सध्या ७२.६७ टक्के पाणीसाठा आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. माेडकसागर भरल्यामुळे दाेन दरवाजे उघडले. याप्रमाणेच आंध्रा धरणात ५६.८२ टक्के पाणीसाठा असून,  आज १३४ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणात ५३.३२ टक्के पाणीसाठा असून, गुरुवारी १६५ मिमी पाऊस पडला. बारवी धरणात ७६.६२ टक्के पाणीसाठा तयार झाला. १५४ मिमी पाऊस झालेल्या बारवी धरणाच्या कान्हाेळ, ठाकूरवाडी, पाटगाव आणि कान्हवरे या पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस झाला.जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी पाऊस 

जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुरबाडला २१२ मिमी. तर, सर्वांत कमी भिवंडीला ११२.७ मिमी पाऊस झाला. हवामान खात्याने शुक्रवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस यलाे अलर्ट असल्यामुळे पावसाची संततधार सुरू राहील. 

‘एनडीआरएफ’ तैनात 

पावसामुळे जिल्ह्यातील सहा पक्क्या व कच्च्या घरांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील मोहने, वरप, वालधुनी, कल्याण, आणे, भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली ही गावे बाधित होण्याची शक्यता लक्षात घेत पाेलिसांसह ‘एनडीआरएफ’चे पथकही तैनात केले आहे.  

चिखली पूल पाण्याखाली; शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला 

अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ३५५ कुटुंबांमधील एक हजार ४०८ जणांना स्थलांतरित केले आहे. उल्हास नदीवरील रायते व रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड महामार्ग बंद आहे. रायते व रुंदे गावातील ९६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.  मुरबाड तालुक्यातील चिखली पूल पाण्याखाली गेल्यामुळे शहापूर व मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला. घाेरला पूलही पाण्याखाली गेला आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून कल्याण आणि अंबरनाथ येथील १०७ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. कल्याण येथील ४० कुटुंबांतील १५६ व्यक्तींनी त्यांच्या नातेवाइकांच्या घरी आसरा घेतला. अंबरनाथ येथील ६७ कुटुंबांतील २०० जणांचे बीएसयूपी इमारतीत तात्पुरते स्थलांतर केले. बदलापूरजवळील कासगाव वृद्धाश्रमातील १२ जणांना स्थलांतरित केले.   

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस