शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसाची तिसऱ्या दिवशीही जोरदार बॅटिंग, २७ ठिकाणी पाणी भरल्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 00:56 IST

रविवारी पहाटेपासूनच शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. पहाटे १२ ते २ या अवघ्या दोन तासांमध्येच २८.९५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर रोड या सर्वच परिसरात नाले आणि रस्त्यांवर पाणी साचले होते.

ठाणे : सलग तिसºया दिवशी ठाणे शहर तसेच कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. धुवाँधार पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पहाटेपासून कोसळणाºया पावसाने दुपारी काहीशी विश्रांती घेतली. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या अवघ्या आठ तासांमध्येच शहरात ९०.६६ मिली मीटर पावसाची नोंद झाली. शहरातील १५ ते २० ठिकाणी झाडे पडली. तर २७ ठिकाणी पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.रविवारी पहाटेपासूनच शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. पहाटे १२ ते २ या अवघ्या दोन तासांमध्येच २८.९५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर रोड या सर्वच परिसरात नाले आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. वंदना सिनेमा, मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती राष्टÑीय महामार्ग आणि कोपरी येथील अनेक रस्त्यांवर पाणी होते.टेंभीनाका येथील धोबी आळीतील मथुराबाई परदेशी चाळीजवळील एका इमारतीचा काही भाग पहाटेच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.वागळे इस्टेट, हाजूरी भागात सुमारे १० ते १२ फूट भिंत कोसळली. चंदनवाडीमध्येही कम्पाउंडची भिंत कोसळल्यामुळे जांभूळकर चाळ धोकादायक स्थितीमध्ये होती.चरईतील दगडी चाळ शाळा, खाळकर आळी, कोपरीतील मिठ बंदर रोड, हिरानंदानी रोड, ब्रम्हांड, कोपरीतील शासकीय वसाहतीमधील बंगला क्रमांक १३, चिराग नगर, राबोडीतील कॅसल मिल, माजीवडा आदी १५ ते २० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. या सर्व ठिकाणी ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने धाव घेऊन रस्ते मोकळे केले.पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पहाटेपासूनच अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या. यामध्ये प्रामुख्याने गोकूळनगर, ऋतू पार्क, माजीवडा, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील आरटीओ कार्यालय, ठाणे रेल्वे स्थानक रोड, वागळे इस्टेट, कृषी विभाग कार्यालय, दिव्यातील अनेक भाग, पाचपाखाडी, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत परिसर, स्टेशन रोड, चेंदणी बंदर, मनिषा नगर कळवा आदी २७ ते ३० ठिकाणी पाणी भरल्याच्या तक्रारी होत्या. अनेक ठिकाणी ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यांमधील झाडे तसेच फांद्यांमुळे अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी मार्ग मोकळे केले.तीन वाहनांवर पडली झाडेमासुंदा तलाव येथेही नौका विहार इमारतीसमोर तीन वाहनांवर झाडे पडण्याच्या घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडल्या. सुदैवाने याठिकाणीही कोणी जखमी झाले नाही.तर खारटन रोड येथे शितलादेवी मंदिरासमोरील मल:निसारण वाहिनीचे चेंबरही खचल्यामुळे नागरिकांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.धर्मवीरनगर, कोपरीतील आनंदनगर, वंदना सिनेमा, रतनभाई कम्पाउंड आदी आठ ते दहा ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्याहोत्या. सायंकाळनंतर हे पाणी ओसरले होते. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे