शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

धुवाधार पावसाने घोडबंदर-ठाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:00 IST

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.

मीरा रोड : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. शिवाय, मीरा-भार्इंदर शहरांतदेखील जागोजागी पाणी साचले असून दुपारी पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

ठाणे-घोडबंदर मार्गालगतचे बेकायदा मातीभराव, त्यातच रस्त्याच्या मध्येच बांधलेल्या दुभाजकांमुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे ठाणे-घोडबंदर रस्ता बंद होऊन असंख्य वाहने अडकली. मात्र महापालिका, जिल्हा प्रशासन, रस्ता ठेकेदार वा आपत्कालीन पथकांपैकी कोणीच येथे न फिरकल्याने पोलिसांनीच जेसीबी मागवून दुभाजक तोडले आणि पाण्याचा मार्ग मोकळा केल्याचे उपस्थितांनी सांगितले. रस्ता बांधताना खालून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असे नालेच बनवले नसल्याचे आढळले. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे ठाण्याहून येणारे मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि काही अधिकारीदेखील यावेळी अडकून पडले होते.काशिमीरा, मीरा रोडच्या बहुतांश भागाचे पाणी घोडबंदर येथील ज्या उघाडीतून वाहून जाते, त्याच्या दरवाजांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता. स्थानिक रहिवासी उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिका अधिकारी आणि स्थानिक तेथे पोहोचले. एका गावकºयास उघाडीत उतरवून दारे उघडल्यानंतर पाण्याचा निचरा वेगाने होऊ लागला. पाण्यातून आलेल्या कचºयामुळेच पाण्याचा निचरा झाला नसल्याचे स्पष्ट झाले.मुंबई - अहमदाबाद मार्गावर रांगाकाजूपाडा रस्ता व वसई हद्दीतील महामार्ग पाण्याखाली आल्याने काशिमीरा भागातून जाणाºया मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूकही ठप्प झाली. लक्ष्मीबाग, काशी, वरसावे आदी भागांतील महामार्गावरही पाणी साचले. मीरा रोडच्या हटकेश, कृष्णस्थळ, गौरव संकल्प फेज-२, अमीष पार्क, शांती पार्कचे हॅप्पी होम कॉम्प्लेक्स, मीनाक्षीनगर, आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू, जयविजयनगर, सिल्व्हर पार्क, शीतलनगर, रामदेव पार्क येथे पाणी साचले. अमीष पार्क व कृष्णस्थळ येथे तर कमरेएवढे पाणी भरले होते....आणि ते बोटीने गेले घरीमीरा रोडच्या सिल्व्हर सरिता भागात कमरेइतके पाणी साचले होते. घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून लोकांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरात जेवणही शिजलेनाही. रस्त्यांना तर नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला यांची नेआण करण्यासाठी पालिकेला बोटी तैनात कराव्या लागल्या.उल्हासनगरातही जोरदार पाऊस झाला. वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीच्या पुराचे पाणी सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, हिराघाट, मातोश्री मीनाताई ठाकरे नगर, शांतीनगर येथे शिरले. वडोळगावातील शाळेसह अन्य ठिकाण्ी पाणी आल्याने शाळेला सुट्टी दिली.मीरा-भार्इंदर जलमयभार्इंदरच्या बेकरी गल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात शिरले. डॉ. आंबेडकर मार्गनाका, राई मुख्य रस्ता, बाळाराम पाटील मार्ग, काशीनगर, शिवशक्तीनगर, खारीगाव हा भागही पाण्याने भरला. अनेकांच्या घरांत आणि दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान होऊन त्यांचे हाल झाले. वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली. शहरातील बहुतांश शाळांना सुट्या देण्यात आल्या. पूरसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात पाणीउपसा करण्यासाठी पालिकेने लावलेले पंप फारसे उपयोगी ठरले नाहीत. मात्र, नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने साचलेले पाणी ओसरू लागले.भिवंडी : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवार रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने सोमवार सकाळपर्यंत शहरातील सखल भागात पुन्हा पाणी साचले. वेळीच पाण्याचा निचरा न झाल्याने तीनबत्ती, शिवाजीनगर आणि ठाणगे आळीतील मच्छी आणि भाजी मार्केट पुन्हा पाण्याखाली गेले.या मार्गावर खाडीकडे जाणारा नाला आहे. खाडीत साचलेल्या घाणीमुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याने हे पाणी दोन दिवसांपासून शहरातील मुख्य मार्केट भागात आणि तेथील दुकानात शिरत आहे. पाणी साचल्याने सोमवारीदेखील मार्केट बंद होते.दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त (आरोग्य) वंदना गुळवे, उपायुक्त दीपक कुरळेकर आणि इतर अधिकाºयांसमवेत नाल्याची व भाजी मार्केटच्या रस्त्याची पाहणी केली. शहरातील सखल भागातील साचलेले पाणी प्रवाहित झाल्याने शहरातील सर्व दुकाने दुपारनंतर पुन्हा सुरू झाली.दरम्यान, खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनीतील कुटुंबांना तात्पुरते पालिका शाळेत हलवण्यात आले असून त्यांना पालिकेमार्फत खाण्याच्या वस्तू देण्यात येत आहेत. तसेच अजमेरनगर येथील डोंगराचा काही भाग रविवारी दुपारनंतर खचल्याने तेथील २६ कुटुंबांना जवळच पालिकेच्या शाळेत हलवले. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे