शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

२७ गावांच्या हरकतींवर सुनावणी; कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात धडकणार ग्रामस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 00:17 IST

सर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली आहे. तिला भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड व मनसे आमदार राजू पाटील यांचे समर्थन आहे.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करायची की महापालिकेतच ठेवायची, या संदर्भात सरकारने मागविलेल्या हरकती, सूचनांवर बुधवारी आणि गुरुवारी बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर २७ गावांचा निर्णय सरकार घेऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली आहे. तिला भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड व मनसे आमदार राजू पाटील यांचे समर्थन आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासोबत या संदर्भात दोनदा मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी सरकारकडून तातडीने निर्णय घेतला जाईल, असे वाटले होते. त्याऐवजी कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

२७ गावे १९८३ पासून महापालिकेत होती. आघाडी सरकारने ही गावे २००२ मध्ये वगळली. या गावांच्या विकासासाठी एमएमआरडीएने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. हा आराखडा तयार झाल्यावर ३० डिसेंबर २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. तेथे कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली. एक हजार ८९ कोटी रुपये त्याकरिता मंजूर केले. मात्र, त्याची एकही वीट पाच वर्षांत रचली गेली नाही. ग्रोथ सेंटरमध्ये २७ गावांपैकी १० गावांचा समावेश होता. या गावांसाठी एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण असेल. नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे २७ गावांत ७९ हजार बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. स्वतंत्र नगरपालिका करायची असल्यास या बेकायदा बांधकामांना नियमित करण्याचा निर्णयही सरकारला घ्यावा लागेल. गावे समाविष्ट करण्यावर घाईने सरकारने हरकती, सूचना मागविल्या. त्यापैकी बहुतांश हरकती सूचना या गावे वगळण्याच्या आहेत. मात्र गावे महापालिकेत सामाविष्ट करणे योग्य होईल, असा अभिप्राय तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांनी दिला. हा अभिप्राय सरकारधार्जीणा असल्याने गावे महापालिकेत सामाविष्ट केली गेली. पुन्हा गावे वगळण्यासाठी ७ सप्टेंबर २०१५ रोजी अधिसूचना काढली. मात्र, ती वगळली गेलेली नाहीत.सुनावणी केवळ फार्स तर नाही ना?२७ गावे वगळण्याबाबत हजारोंच्या संख्येत हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत त्यांची सुनावणी कशी पार पडेल, असा प्रश्न आहे. त्यामुळे सुनावणीचा केवळ फार्स नाही ना, अशी शंका पुन्हा उपस्थित केली जात आहे.स्वतंत्र नगरपालिकेची मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी स्वतंत्र नगरपालिकेस विरोध करणारे काही नगरसेवक आहेत. सुनावणी दरम्यान त्यांचा विरोध नोंदविला जाऊ शकतो. सुनावणीसाठी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहता यावे, यासाठी आमदार पाटील यांनी बसची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे