जिल्हा परिषद निवडणुकीवर २ मार्चला सुनावणी
By Admin | Updated: February 22, 2016 00:39 IST2016-02-22T00:39:05+5:302016-02-22T00:39:05+5:30
दीर्घकाळापासून रखडलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीविरोधातील जनहित याचिकेची सुनावणी २ मार्चला होणार आहे. जनहित याचिकेच्या पहिल्या सुनावणीनंतर अद्याप

जिल्हा परिषद निवडणुकीवर २ मार्चला सुनावणी
ठाणे : दीर्घकाळापासून रखडलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीविरोधातील जनहित याचिकेची सुनावणी २ मार्चला होणार आहे. जनहित याचिकेच्या पहिल्या सुनावणीनंतर अद्याप यावर चर्चा झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तो चर्चेचा विषय आहे.
या सुनावणीसाठी निवडणूक आयोग, ग्रामविकास मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आधीच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी ठरलेल्या आठ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांची मते विचारात घेतल्यानंतरच जि.प.च्या आगामी निवडणुकीसंदर्भात सुनावणी होईल, अशी शक्यता आहे.
याची पहिली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात २८ सप्टेंबरला होणार होती. ती पुढे ढकलण्यात आली. पुढे २० आॅक्टोबरला ही सुनावणी झाली नाही. त्यानंतर, १८ डिसेंबरची तारीख होती. पण, तेव्हाही सुनावणी न झाल्याने १८ जानेवारी, २ फेब्रुवारी अशा तारखा पडल्या. पण, तेव्हाही यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे २ मार्चला सुनावणी होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जाते. जिल्हा निवडणुकीविरोधात राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेऊन चार आठवड्यांची स्थगिती मिळवली होती.