Headless body found in a mountain near Mumbra | मुंब्य्राजवळील डोंगरामध्ये आढळला डोके नसलेला मृतदेह

मुंब्य्राजवळील डोंगरामध्ये आढळला डोके नसलेला मृतदेह

मुंब्रा : एका पुरुषाची निर्घृण हत्या करून त्याचे शिरच्छेद केलेले धड मुंब्य्राजवळील डोंगरामधील झुडुपांमध्ये फेकून दिल्याची खळबळजनक घटना शुक्र वारी सकाळी उघडकीस आली.
डोके नसलेला अनोळखी मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ जवळील उत्तरशीव भागातील दहिसर मोरी परिसरातील ठाकूरपाडा येथील डोंगरभागात आढळला. एका लहान मुलाने तो बघितला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि बिडीची थोटकेही आढळून अली. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाच्या डोक्याचा भाग शोधणे सुरू असल्याचे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सांगितले.

Web Title: Headless body found in a mountain near Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.