...वह काला धन समझता है!

By Admin | Updated: December 26, 2016 07:01 IST2016-12-26T07:01:52+5:302016-12-26T07:01:52+5:30

सुफियान प्रतापगढी या अवघ्या ११ वर्षांच्या मुलाने ‘निकम्मा लकडीको चंदन समझता है, बडा नादान है वह, कोई समझाए वह चायवाले को,

... he understands black money! | ...वह काला धन समझता है!

...वह काला धन समझता है!

कुमार बडदे / मुंब्रा
सुफियान प्रतापगढी या अवघ्या ११वर्षांच्या मुलाने ‘निकम्मा लकडीको चंदन समझता है, बडा नादान है वह, कोई समझाए वह चायवाले को, गरीब की कमाई को वह कालाधन समझता है’, अशा शब्दांत नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. निमित्त होते, ते शनिवारी रात्री आयोजित केलेल्या आठव्या कुलहिंद मुशायऱ्याचे.
नोटाबंदीमुळे देशात निर्माण झालेली अराजकसदृश परिस्थिती आणि दहशतवाद अशा विविध विषयांवर शेरोशायरी तसेच गझलांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोंदींना लक्ष्य करण्यात आले. ‘तुम क्या समझते हो यह देश को आबाद करेगा, अरे बरबाद करने आया है, बरबाद करके रहेगा, अशी टीका वाहिद अन्सारी या शायरने केले. शिबना बी या महिला शायरने तर, ‘सुनहरे ख्वाब दिखाने मे माहिर है वह,बेवकुफ बनाने मे माहिर है वह, वतन चलाना उस के बस मे नही, मगर जबान चलाने में माहिर है वह, ऐलान कर रहा है आतंकवाद को खत्म करने का,आतंकवादीओके सरदार तुम्ही हो’, अशी बोचरी टीका केली. अकरम बलरामपुरी यांनी ‘हर तरह जुल्म,दहशत की तसबीर है, क्या ये भारत के ख्वाबो की ताबीर है’, अशी विचारणा करून ‘फैसला एक का हैरान सबको कर गया,नोटबंदीपर एक बिकती हुकूमतसे मतलब नही’, अशी टीका केली.
नोटाबंदीमुळे बँकांच्या रांगांमध्ये विविध कारणांमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याने व्याकूळ झालेल्या इमरान प्रतापगढी यांनी ‘खुद की औलाद नही है तो बताओ कितने माँओको बेऔलाद करोगे,और कितना हमे बरबाद करोगे साहेब’, असा भावुक सवाल मोंदीना केला.
देशनिष्ठा सिद्ध करण्याच्या वादावर भाष्य करताना तेच म्हणाले की,‘कौन कहता है दिल मे वतन नही रखते, तुम्हारे तरह दिलमें नफरतही नही रखते.’ ‘नोटबंदीसे मत डराओ हमे,जकात देते है कालाधन रखते ही नही.’ ‘पहले चाय,चाय करते थे, अब गाय गाय करते है’, अशी व्यंगात्मक टीका केली.
रात्री ८ ते मध्यरात्री ३वाजेपर्यंत सलग ७ चाललेल्या मुशायऱ्यामध्ये मुन्नवर राणा, मोनिका दहलवी, इंद्रिस निजामी, नासीर जौनपुरी, हंगामा आजमी, विनोद पाल, रु ख्सार बलरामपुरी, निसम खान,आखीलराज इंदौरी, शबाना शबनम आदींनी त्यांच्या रचना सादर केल्या. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे आणि शालेय परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: ... he understands black money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.