‘तो’ पैसा देशविघातक कारवायांसाठी, खंडणी प्रकरणी कासकरसह चौघांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:51 IST2017-10-27T05:51:54+5:302017-10-27T05:51:57+5:30

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने खंडणीतून उकळलेला पैसा देशविघातक कारवायांसाठी वापरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

'He' money for the anti-corruption activities, four quizzes in connection with the ransom case | ‘तो’ पैसा देशविघातक कारवायांसाठी, खंडणी प्रकरणी कासकरसह चौघांची चौकशी

‘तो’ पैसा देशविघातक कारवायांसाठी, खंडणी प्रकरणी कासकरसह चौघांची चौकशी

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने खंडणीतून उकळलेला पैसा देशविघातक कारवायांसाठी वापरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मकोकाअंतर्गत आरोपींची कोठडी मागताना पोलिसांनी बुधवारी न्यायालयासमोर ही माहिती दिली.
कासारवडवली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये बिल्डरने खंडणीपोटी मुमताज एजाज शेख याच्या नावावर एक फ्लॅट केला होता. याशिवाय, दोन फ्लॅट विकून जवळपास ९० लाख रुपयांची रोकड दिली होती. तसेच खंडणीच्या दुसºया गुन्ह्यामध्ये १५ लाखांचे सोने, तर तिसºया गुन्ह्यामध्ये ३ कोटी रुपयांची रोख खंडणी वसूल केली होती. सोन्याच्या स्वरूपात घेतलेल्या खंडणीचा जवळपास निम्मा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. उर्वरित सोने आणि रोकडचा हिशेब प्
ाोलिसांना आरोपींकडून मिळालेला नाही. आरोपींनी हा पैसा
देशविघातक कारवायांसाठी वापरला असावा, असा संशय पोलिसांनी न्यायालयासमोर व्यक्त करून आरोपींच्या कोठडीची मागणी बुधवारी केली होती.
इक्बाल कासकरसह चारही आरोपी ४ नोव्हेंबरपर्यंत मकोकाअंतर्गत पोलीस कोठडीत आहेत. यादरम्यान आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यावर पोलिसांकडून भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोपी पंकज गंगर याचा राजस्थान आणि गुजरातमध्ये मटक्याचा मोठा धंदा आहे. तो छोटा शकीलचा फायनान्सर असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. गंगरच्या मोबाइल फोनच्या कॉल्सचा तपशील पोलिसांनी तपासला असता, तो छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याची माहितीही समोर आली. चारही आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयाकडून केला जातो. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाचे
सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम हे आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
>खंडणीचे तीन गुन्हे
खंडणीच्या तीन गुन्ह्यांमध्ये इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज एजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली आहे.

Web Title: 'He' money for the anti-corruption activities, four quizzes in connection with the ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.