पत्नीच्या हत्येनंतर गॅस सिलिंडर लिक करून तो पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST2021-09-03T04:42:45+5:302021-09-03T04:42:45+5:30

मुंब्रा : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीने जाताना घरातील स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर लिकेज करून ठेवल्याची घटना इमारतीमधील रहिवाशांच्या ...

He escaped by leaking a gas cylinder after killing his wife | पत्नीच्या हत्येनंतर गॅस सिलिंडर लिक करून तो पळाला

पत्नीच्या हत्येनंतर गॅस सिलिंडर लिक करून तो पळाला

मुंब्रा : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीने जाताना घरातील स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर लिकेज करून ठेवल्याची घटना इमारतीमधील रहिवाशांच्या वेळीच उघडकीस आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून घराच्या खिडक्या उघडून घरात जमा झालेला गॅस बाहेर जाण्यास वाट मोकळी करून दिल्याने मोठी दुर्घटना टळली.

येथील रेल्वे स्थानकासमोरील बुऱ्हानी गृहसंकुलाच्या ए विंगमधील रूम नंबर ७६ मध्ये बुधवारी सदफ सैफी या २२ वर्षांच्या विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिची हत्या करून नवरा शाहनवाज हा पसार झाला असल्याची तक्रार तिचे वडील समीरउद्दीन शेख यांनी गुरुवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून त्याच्याविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: He escaped by leaking a gas cylinder after killing his wife