तीन मोटारीच्या काचा फोडून कारटेप चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:47+5:302021-08-15T04:40:47+5:30

ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी विविध ठिकाणी उभ्या केलेल्या तीन मोटारींच्या काचा फोडून मोटारींतील तीन ...

He broke the glass of three cars and stole the car tape | तीन मोटारीच्या काचा फोडून कारटेप चोरीला

तीन मोटारीच्या काचा फोडून कारटेप चोरीला

ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी विविध ठिकाणी उभ्या केलेल्या तीन मोटारींच्या काचा फोडून मोटारींतील तीन किमती कारटेप चोरून नेले. तसेच मोटारीमधील छत्री चोरून नेली. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद दिघे मैदानाच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या मोटारीमधील किमती टचस्क्रीन आणि छत्री मोटारीची पुढील बाजूच्या डाव्या बाजूची काच फोडून अनोळखी चोराने चोरून नेली. दुसऱ्या प्रकरणात मोटारीचा पुढील बाजूचा दरवाजा अनोळखी चोराने तोडून कारटेप चोरून नेला. तर तिसऱ्या घटनेत पाचपाखाडी भागात उभी करून ठेवलेल्या मोटारीमधील कारटेप अनोळखी चोराने चोरून नेला. या तीनही घटना १३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडल्या. मागील काही दिवसांत ठाणे शहरात कारटेप चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

..........

वाचली

Web Title: He broke the glass of three cars and stole the car tape