शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

घणसोलीच्या अ‍ॅटलान्टिस टॉवरवर अखेर हातोडा, पालिका आयुक्तांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:30 IST

- नारायण जाधव ठाणे : नवी मुंबईतील घणसोली नोडमधील सर्वात उत्तुंग इमारत अशी ओळख सांगणाऱ्या अ‍ॅटलान्टिस टॉवरच्या विकासकाला चटईक्षेत्राची ...

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबईतील घणसोली नोडमधील सर्वात उत्तुंग इमारत अशी ओळख सांगणाऱ्या अ‍ॅटलान्टिस टॉवरच्या विकासकाला चटईक्षेत्राची चोरी करणे अखेर चांगलेच महागात पडले आहे. ‘लोकमत’ने त्याची ही चोरी उघडकीस आणल्यानंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी सर्वप्रथम तो अनधिकृत ठरवून त्यातील घरे व दुकाने घेऊ नयेत, असे आवाहन केले होते. त्यानंतर, दुसºया दिवशी त्यातील घरे अणि दुकानांची नोंदणी करू नये, असे पत्र दुय्यम निबंधकांना देऊन, त्यावर एमआरटीपी कायद्यान्वये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आयुक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात या टॉवरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त अमरिश पत्निगिरे आणि सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांच्या पथकाने शुक्रवारी तीन दुकानांंसह एका सदनिकेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ही कारवाई पुढील पाच सहा दिवस सुरू राहणार असल्याचे नागरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.रहिवाशांचा विरोध मावळलाशुक्रवारी पालिकेचे पथक कारवाईस गेले असता रहिवाशांनी तीव्र विरोध केला. नोटीस न बजावता कारवाई कशी काय करता, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, तुमच्या टॉवरची अद्याप सोसायटी झाली नसल्याने, आम्ही विकासक बी अँड एम बिल्डकॉन यांना जबाबदार धरले असून, त्यांच्या विरोधात रीतसर कायदेशीर कार्यवाहीची पूर्तता केल्यानंतरच ही तोडकाम सुरू केली असल्याचे नागरे आणि अतिक्रमण विभागाचे अभियंता पिंपळगावकर यांनी स्पष्ट केले.तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार असला, तर तुमच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पालिकेच्या पथकाने स्पष्ट केले. त्यानंतर मात्र, रहिवाशांनी विरोधाचे आपले हत्यावर म्यान करून पालिकेच्या पथकास कारवाई करू दिली. त्यानुसार, पहिल्या दिवशी तीन दुकानांसह एका सदनिकेवर कारवाई करण्यात आली. बांधकामांचा दर्जा आणि रहिवाशांच्या किमती सामानास हानी पोहोचू नये, म्हणून उद्यापासून अत्याधुनिक हत्यारांनी बांधकाम तोडण्यात येणार आहे.का केली कारवाई?अ‍ॅटलान्टिस हा नवी मुंबईतील घणसोली नोडमधील सेक्टर ११ मधील प्लॉट नंबर ५ वरील सर्वांत उत्तुंग असा ३४ माळ्यांचा टॉवर असून १२ हजार चौरस मीटर इतक्या विस्तीर्ण भूखंडावर तो तीन विंगमध्ये बांधला आहे. त्यात २५८ सदनिका आणि १६ दुकाने आहेत. मात्र, त्याचे विकासक असलेल्या बी अ‍ॅण्ड एम बिल्डकॉन यांनी त्याचे बांधकाम करताना चटईक्षेत्राची वारेमाप चोरी केली आहे. यात कपाटे बांधलेली नाहीत. टेरेस जे दिले होते, त्यांचे रूपांतर बेडरूममध्ये केले आहे. फ्लॉवरबेडमध्ये बाल्कनीचे बांधकाम केले आहे. तसेच मंजूर नकाशापेक्षा मोठे टेरेस बांधले आहे.हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेने ३ मे २०१८ च्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार वृत्तपत्रांत प्रसिद्धी देऊन तो एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ (१) नुसारअनधिकृत ठरवून त्यात घरे आणि दुकाने न घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर दुय्यम निबंधकांना पत्र पाठवून त्यातील घरे आणि दुकानांची नोंदणी न करण्यास सांगितले. तसेच रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी कारवाई सुरू केली.इतर विकासक धास्तावलेबी अ‍ॅण्ड एम बिल्डकॉनसारख्या एका मोठ्या विकासकाला अशा प्रकारे महापालिकेने दणका दिल्याने याच धर्तीवर चटईक्षेत्राची चोरी करून सदनिका आणि दुकाने विकून कोट्यवधींची फसवणूक करणाºया नवी मुंबईतील इतर विकासकांचे मात्र धाबे दणाणले आहे.स्थायी समितीनेही उठवला होता आवाजस्थायी समितीच्या बैठकीतही सर्वपक्षीय नगरसेवकांनी नवी मुंबईतील अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करणाºया विकासकांविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर सभापतींनी केवळ बी अ‍ॅण्ड एम बिल्डकॉनच नव्हेतर, गेल्या दहा वर्षांत अनधिकृत बांधकामे करणाºया विकासकांचा अहवालमागविला आहे.

टॅग्स :thaneठाणे