शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 16:55 IST

कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चिंचपोकळी येथे फूटपाथवर आढळले होते.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी श्रीवर्धनकर यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सामाजिक संस्थेच्या मदतीने दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली होती आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली होती.

मुंबईवर झालेल्या भीषण २६/११ दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर त्यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चिंचपोकळी येथे फूटपाथवर आढळले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या कल्याण येथील कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं.काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनकर यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना रुग्णालयात दाखल केले होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला गेले होते. फडणवीस यांनी त्यांच्या उपचारासाठी भाजपकडून १० लाखाच्या मदतीची घोषणा देखील केली होती.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर यांना एक गोळी देखील लागलेली होती. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशी देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे श्रीवर्धनकर हे मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फासावर लटवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने घातलेल्या दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते. 

अलीकडेच मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांना श्रीवर्धनकर रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते. माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना आसरा दिला. अन्न - पाण्याशिवाय श्रीवर्धनकर हे वृद्ध आजोबा रस्त्यावर राहत होते. श्रीवर्धनकर यांना त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर काढले असून नाईलाजाने त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर सामाजिक संस्थेच्या मदतीने दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली होती आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली होती.

२६/११ च्या हल्ल्यातील साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांना भाजपाकडून 10 लाखांचा चेक

हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार

 

धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाDeathमृत्यूterroristदहशतवादी