शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

'हर हर मोदी घर घर मोदी'ची घोषणा अन् भाषणावेळी गर्दी आटली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 17:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हॅलीकॉप्टर लँड झाल्याची माहती व्यासपीठावरून देण्यात आल्यानंतर सभामंडपात आणि बाहेरच्या बाजूला सर्वत्र प्रचंड जयघोष झाला, नारेबाजी झाली.

डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हॅलीकॉप्टर लँड झाल्याची माहती व्यासपीठावरून देण्यात आल्यानंतर सभामंडपात आणि बाहेरच्या बाजूला सर्वत्र प्रचंड जयघोष झाला, नारेबाजी झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला, अनेकांनी २०१४ च्या निवडणुकीमधील हर हर मोदी घर घर मोदीच्या घोषणा देत, जय श्रीराम चा हुंकार देण्यात आला. श्रीराम मंदिर कायदा करा अशीही नारेबाजी करण्यात आली. प्रचंड जल्लोषात कार्यकर्त्यांनी मोदींचे स्वागत केले, काही काळ घोषणा सुरूच होत्या, मोदींनी देखिल मनसोक्त हात वर करत कार्यकर्त्यांना साद दिली. त्याचा परिणाम बाहेर उभे असलेल्या हजारो कार्यकर्त्यांवर झाला, जागा मिळेल तिथे कार्यकर्ते एलईडीसमोर उन्हात, काही जण समोरच्या रस्त्यानजीकच्या पदपथावरील झाडांच्या सावलीचा आसरा घेत उभे होते. आठ मुख्य ठिकाणी काही अंतरांवर एलईडी व्हॅन उभ्या करण्यात आल्या होत्या, मुख्य सभामंडपातील व्यासपीठावरचे सर्व क्षणचित्रे त्या ठिकाणी लाइव्ह दाखवण्यात आली होती.

- बापगावच्या मोकळया भुखंडावर हॅलीपॅडच्या ठिकाणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह विविध मान्यवर तेथे गेले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी सगळया आमदारांसमवेत आणि खासदार कपिल पाटील यांच्यासमवेत हस्तांदोलन करत आनंद व्यक्त केला. काही क्षण चर्चा करत त्यांनी दुपारी २.४०नंतर फडके मैदानाकडे कूच केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रचंड पोलिस बंदोबस्त ताफा पुढे सरकला. त्यामुळे रस्त्यावरही ठिकठिकाणी मोदी भक्त उभे होते, त्यांनीही मोदींना बघण्यासाठी एकच गर्दी केली, पण गाड्यांच्या ताफ्यात नेमक्या कोणत्या गाडीत पंतप्रधान बसले होते, हे न कळाल्यानेही काहींचा भ्रमनिरास झाला....मोदींच्या भाषणाला पेंडॉलमधील गर्दी झाली कमीसकाळी ११ वाजल्यानंतर सभामंडपात हळुहळु गर्दी झाल्यानंतर मात्र बसण्यासही जागा नसल्याने अनेकांना दुर्गाडी किल्यानजीकच्या चौकाजवळ पेंडॉल टाकण्यात आला होता, त्या ठिकाणीही सुमारे १ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती,उन्हात ताटखलत उभे राहण्यापेक्षा काहींनी त्या पेंडॉलमध्ये जाणे पसंत केले, तेथे मोठी एलईडी स्क्रिनची व्यवस्थ होती, त्यामुळे तेथे काही काळ गर्दी झाली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर मात्र पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या वेळी मात्र नागरिकांनी खुर्च्या रिकाम्या केल्याचे चित्र होते. त्यानंत काही वेळात पेंडॉल काहीसा रिकामा झाला होता. मोकळया खुर्च्या सगळयांचे लक्ष वेधून घेत होत्या, आणि तो एक चर्चेचा विषय बनला होता.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणे