फोटोग्राफी स्पर्धेत हनिफ तडवी द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST2021-08-22T04:42:33+5:302021-08-22T04:42:33+5:30

ठाणे : ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब यांनी विश्व फोटोग्राफी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील येथील छायाचित्रकार हनिफ ...

Hanif Tadvi II in Photography Competition | फोटोग्राफी स्पर्धेत हनिफ तडवी द्वितीय

फोटोग्राफी स्पर्धेत हनिफ तडवी द्वितीय

ठाणे : ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब यांनी विश्व फोटोग्राफी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील येथील छायाचित्रकार हनिफ तडवी यांची द्वितीय क्रमांकावर निवड केली. पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

या स्पर्धेत "रंग" हा विषय होता. संपूर्ण भारतातून असंख्य फोटोग्राफर सहभागी झाले होते. यंदा या क्लबला २५ वर्षे पूर्ण झाले. हनिफ यांनी ठाणे रेल्वे स्थानकावरील एका वृद्धेचा फोटो काढला होता. या छायाचित्रांमध्ये रंग विषय खुलून दिसत होता. फलाटामधील निळा आणि लाल रंग, त्यात आज्जीने नेसलेले लुगडे रंगीत आणि उशाखाली घेतलेले गाठोडे असे असंख्य रंग एका फोटोत दिसत होते. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ छायाचित्रकार सुभाष जिरंगे यांनी केले. ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लबचे राजन गुप्ता, चेतन जोशी आणि मत्रीश्वा व्यास यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पार पाडली.

Web Title: Hanif Tadvi II in Photography Competition