फेरीवाल्यांसाठी अपंग संघटना न्यायालयात
By Admin | Updated: May 9, 2017 01:00 IST2017-05-09T01:00:49+5:302017-05-09T01:00:49+5:30
फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बाजारपेठ उभारण्यात यावी, यासाठी अपंग संघटना मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.

फेरीवाल्यांसाठी अपंग संघटना न्यायालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बाजारपेठ उभारण्यात यावी, यासाठी अपंग संघटना मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. मुंब्य्रातील अमृतनगर ते कौसादरम्यान रस्त्याच्या दुतफर् ा बसणाऱ्या शेकडो फेरीवाल्यांमुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ वर नेहमी वाहतूककोंडी होते. यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेचे अतिक्र मणविरोधी पथक फेरीवाल्यांवर तात्पुरती कारवाई करते. मात्र, दोन दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. यामुळे रस्ता मोकळा करायचे प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य होत नाही. तसेच फेरीवाल्यांचेदेखील आर्थिक नुकसान होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी १९९९ च्या विकास आराखड्यानुसार फेरीवाल्यांसाठी आरक्षित केलेल्या सर्व्हे क्र मांक १४६, १०४, १५४, १५५, १०७, १२७, १२८, ६७ (हिस्सा नंबर ११६), ४५, १२९ (अ) या भूखंडांवर फेरीवाल्यांसाठी त्वरित बाजारपेठ बांधण्यात यावी, अशी मागणी बृहन्महाराष्ट्र अपंग विकास कामगार संघटनेचे सचिव युसुफ खान यांनी केली आहे. महापालिकेने याची अंमलबजावणी न केल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.