भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

By नितीन पंडित | Published: April 1, 2024 07:08 PM2024-04-01T19:08:12+5:302024-04-01T19:09:31+5:30

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

Handa morcha of laborers against water shortage in Bhiwandi at ten Gram Panchayats | भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

भिवंडी: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रातील नळ पाणी पुरवठा योजना ठप्प पडलेल्या असल्याने तेथील अनेक आदिवासी पाडे वस्त्यांवर पाणी नसल्याने या पाणीटंचाईच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील दहा ग्रामपंचायत कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले होते.

तालुक्यातील गणेशपुरी,अकलोली,वज्रेश्वरी, महाळूंगे, घोटगाव, दाभाड, राहुर, धामणगाव, वडपे व जुनांदुर्खी या गावातील आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची भीषणता अधिक असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप यावेळी श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी केला आहे.

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये पाण्याचे स्तोत्र नसताना कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असून, कागदा वरील ठेकेदार व प्रत्यक्षात काम करणारे ठेकेदार हे वेगवेगळे असल्या कारणाने ही कामे रेंगाळत पडले असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामीण जनतेला बसत असल्याचा आरोप अशोक सापटे यांनी केला आहे.

या मोर्चामध्ये प्रवक्ता प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे,शहराध्यक्ष सागर देसक,महेंद्र निरगुडा, मोतीराम नामखुडा यांसह स्थानिक गाव कमिटी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ज्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट आहे तेथे तात्काळ टँकर द्वारे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी या मोर्चाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत प्रशासना कडे करण्यात आली आहे.

Web Title: Handa morcha of laborers against water shortage in Bhiwandi at ten Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.